प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ चित्रपट सध्या बराच गाजतोय. सर्वत्र या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशीच चर्चा ६ वर्षांपूर्वी ‘सैराट’ चित्रपटाची झाली होती. नागराज मंजुळेंचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट त्यावेळी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. या चित्रपटातील काही सीन तर प्रेक्षकांमध्ये एवढे लोकप्रिय झाले होते की त्याची जोरदार चर्चा झाली होती. या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर आता ६ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र आली. ‘झुंड’ चित्रपटाच्या निमित्तानं रिंकू आणि आकाश पुन्हा एकत्र पाहायला मिळाले.

‘झुंड’ चित्रपटाचं प्रमोशन सुरू असताना आकाश आणि रिंकू म्हणजेच प्रेक्षकांचे लाडके आर्ची आणि परश्या यांनी त्यांच्या ‘सैराट’ चित्रपटातील एक लोकप्रिय सीन पुन्हा रिक्रिएट केला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. तब्बल ६ वर्षांनंतर हा सीन रिक्रिएट करताना आर्ची आणि परश्याचा तोच अंदाज पुन्हा पाहायला मिळाला.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
pune video : 80 years old lady selling panipuri
पुण्यातील ८० वर्षांची आज्जी विकते पाणी पुरी, Viral Video एकदा पाहाच
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच
dance in kolhapur on marathi song halagi tune
“एकदा वय निघून गेलं की हा आनंद नाही” हलगीच्या तालावर मित्रांनी धरला ठेका; VIDEO पाहून म्हणाल नादच खुळा…
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

आणखी वाचा- Video: भर रस्त्यात काजोल आणि करीना गाडीतून उतरल्या अन्…

सैराट चित्रपटात एक सीन आहे ज्याची प्रेक्षकांमध्ये बरीच क्रेझ पाहायला मिळाली होती. यामध्ये आर्ची खेळत असताना परश्या तिला एकटक बघत असतो आणि हे जेव्हा तिच्या लक्षात येत तेव्हा ती बेधडकपणे त्याला, ‘तू का माझ्याकडे बघतोस?’ असं विचारते. त्यावर परश्या ‘तू का माझ्याकडं बघतेस?’ असं म्हणतो. मग गप्प राहिल ती आर्ची कसली. ती देखील त्याला म्हणते, ‘मी बघीन नाहीतर कायपण करेन’ यावर परश्या देखील तिला, ‘मग मी पण बघीन नाहीतर कायपण करेन. तुला नसेल आवडत तर नको बघू की’ असं प्रतिउत्तर देतो आणि मग आर्ची पण त्याला, ‘मी कुठं म्हणलं मला नाही आवडत’ असं म्हणते. हाच सीन रिंकू आणि आकाशनं ‘झुंड’च्या प्रमोशन कार्यक्रमात रिक्रिएट केला.

आणखी वाचा- हृतिक रोशन आजारी गर्लफ्रेंडची अशी घेतोय काळजी, सबा आझादनं शेअर केला फोटो

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. आज ६ वर्षांनंतरही या दोघांची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. दोघांनीही त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून केली होती. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. या चित्रपटानं त्यावेळी ११० कोटींचा गल्ला जमवला होता. आर्ची आणि परश्याची ही जोडी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली होती. यासोबतच त्यांच्या सहज आणि अप्रतिम अभिनयाचंही बरंच कौतुक झालं होतं.

Story img Loader