‘सैराट’च्या यशाने खूप गोष्टी घडत असतानाच त्यात आता काही मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनांचे नियोजित वेळापत्रक कोलमडत असल्याचे चित्र समोर येत आहे. २९ एप्रिल रोजी झळकलेल्या ‘सैराट’ने पहिल्याच दिवशी रसिकांचे भरभरून प्रेम मिळवले. ६ मे रोजी एकही मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नव्हता. पण त्यानंतरच्या १३ मे रोजीदेखील एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झाला नाही. यावेळी झळकणारा ‘चिटर’ १० जूनला ढकलला गेला. २० मेचा ‘यूथ’ही पुढे ढकलला. ‘किरण कुलकर्णी विरुद्ध किरण कुलकर्णी’ची तारीख निश्चित करणे टाळले. ‘दुनिया गेली तेल लावत’ही १० जूनपर्यंत तर ‘३५ टक्के काठावर पास’ चक्क २९ जुलैपर्यंत पुढे ढकलले गेले. १३ मेचा ‘पैसा पैसा’ २० मेला झळकला, पण ‘सैराट’च्या तावडीत सापडला. त्यासोबतच्या ‘आर्त’चे प्रदर्शन चौथ्याच दिवशी मागे घेतले व तशी जाहिरातही दिली. २७ मे रोजी झळकणारा ‘लाल इश्क’ ‘सैराट’चे वादळ थोपवतो का पाहणे कुतुहलाचे ठरेल. या शुक्रवारी प्रदर्शित होणारा तो एकमेव चित्रपट आहे. प्रदर्शने पुढे ढकललेल्या चित्रपटाना प्रसिद्धी व चित्रपटगृहे मिळवणे आव्हानात्मक ठरू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा