‘सैराट’ फेम परश्या म्हणजेच आकाश ठोसर सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘1962- द वॉर इन द हिल्स’ या वेब सीरिजमधून आकाशने एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. 1962 सालच्या भारत चीन युद्धाची कथा या वेब सीरिजमधून मांडण्यात आली आहे. तर आकाशने एका सैनिकाची भूमिका या वेब सीरिजमध्ये साकारली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या भूमिकेसाठी आकाशने मोठी मेहनत घेतली आहे. यासाठी त्याने 10 किलो वजनही वाढवलं. भूमिकेच्या तयारीसाठी त्याला व्यायाम शाळेत चांगलाच घाम गाळावा लागलाय. तर या वेब सीरिजमध्ये आकाशची अॅक्शनही प्रेक्षकांना पाहायला मिळाली. शूटिंगच्या दरम्यानचे अनेक फोटो तसचं अॅक्शन सीनच्या सरावाचे व्हिडीओ आकाशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
नुकताच आकाशने एक कुस्तीच्या आखाड्यातील व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. ‘1962- द वॉर इन द हिल्स’ या वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या सीरिजमध्ये एका सीनमध्ये आकाश कुस्ती खेळताना दिसून येतोय. त्याच सीनच्या चित्रिकरणाचा हा व्हिडीओ आहे.
अभिनयात येण्यापूर्वी आकाशला कुस्तीची आवड होती. त्यातच त्याला करिअर करायचं होतं. यासाठी त्याने प्रशिक्षण घेण्यास सुरुवातदेखील केली होती. त्यामुळेच आकाशने हा व्हिडीओ शेअर करताना पैलवान मित्रांचे आभार मानले आहेत. आकाशच्या व्हिडीओला अनेकांनी पसंती दिलीय. तर आकाशला पुन्हा आखाड्यात पाहून आनंद झाल्याच्या भावना काही चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरूने देखील आकाशच्या व्हिडीओला ‘यो’ अशी कमेंट दिलीय. यावर आकाशने तिला पुन्हा ‘यो’ म्हणत रिप्लाय दिलाय.
“खास माझ्या पैलवान मित्रांसाठी ” असं म्हणत आकाशने कॅप्शनमधून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुढे त्यानं लिहलंय “लहानपणापासूनच कळत-नकळत मातीचा लळा लागला. वडिलांनी माझ्या आणि त्यांच्या हौशेपोटी तालमीत पाठवलं. तालमीत 5 वर्ष काढली.’तालीम’ जोर,बैठका, डावपेच,शिस्त या पलीकडेही बरंच काही देऊन गेली.
तालमीतलं हसतं-खेळतं वातावरण, एकाच ध्येयाने पेटून उठलेले पैलवान सवंगडी, रोज न चुकता करायचा सराव,गप्पा-गोष्टी…अशा सगळ्या आठवणी अजूनही सोबत आहेत.लाल मातीच्या स्पर्शात एक वेगळीच ताकद आणि ऊर्जा आहे.आणि त्यामुळेच मी इथपर्यंत आलो.या लाल मातीचा आणि माझ्या गुरुजनांचा,पैलवान मित्रांचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. आणि त्याचाच उपयोग आज मला या कला क्षेत्रात होतोय. या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला या मातीत रुजायला,खेळायला आणि लढायला शिकवलं त्या सर्व माझ्या मातीतल्या माणसांना प्रणाम आणि धन्यवाद…खरंतर आभार , धन्यवाद हे शद्ब कितीही केलं तरी तुम्हा सगळ्यांसाठी अपुरे आहेत…तरीही तुमचा सर्वांचा मी सदैव ऋणी राहील आणि मातीशी हे माझं नातं असच घट्ट राहील.” असं लिहतं आकाशने पैलवान मित्रांचे आभार मानले आहेत.
अभिनयात येण्याआधी आकाश कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी सोलापुरला गेला होता. इथेच दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची नजर त्याच्यावर पडली. त्यांनी आकाशला सैराट सिनेमासाठी विचारणा केली. इथून आकाशचा अभिनय क्षेत्राचा प्रवास सुरु झाला. सैराटच्या यशानंतर आकाशने ‘फ्रेन्डशीप अनलिमिटेड’ आणि ‘लस्ट स्टोरी’ या सिनेमांमध्ये काम केलं. लवकरच तो नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या हिंदी सिनेमातही दिसणार आहे.