नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटाने प्रसिद्धीस आलेली रिंकू राजगुरु हिने वैयक्तिक आयुष्यात झिंगाट कामगिरी केली आहे. रिंकू राजगुरुने ‘सैराट’ मधील अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित तर केलेच. पण तिने खऱ्या आयुष्यातही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. रिंकूने नववीमध्ये तब्बल ८१.६० टक्के गुण मिळवले आहेत.
रिंकू राजगुरुचा कालच निकाल जाहीर झाला. त्यानंतर रिंकूने तिला नववीच्या परीक्षेत ८१.६० टक्के मिळाल्याची पोस्ट टाकली असून तिने एक फोटोही पोस्ट केला आहे. यात तिने शाळेचा गणवेश परिधान केला असून तिच्यासोबत तिचे सरही यात दिसतात. त्यात तिने लिहलेय की, निकाल लागला, ८१.६० % नववी — feeling सैराट.
सैराटमधील अभिनयासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर आता अभ्यासामध्येही अव्वल येऊन रिंकूने चाहत्यांवर छाप सोडली आहे.
13119033_169518400111268_3565771357614767613_n

Story img Loader