‘सैराट’ चित्रपटातून तरुणाईला याड लावणारी ‘आर्ची’ आंतरजातीय विवाह योजनेची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होणार अशी चर्चा आहे. आंतरजातीय विवाह योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार रिंकू राजगुरूच्या नावाचा विचार करतंय. समाजिक न्याय विभाग यासंदर्भात लवकरच निर्णय घेईल, असे सांगितले जातेय.
सामाजिक न्याय विभाग आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याचे काम करते. जाती अंताच्या लढ्याकरिता अशा विवाहांना हा विभाग प्रोत्साहन देतो. आंतरजातीय विवाहाच्या मुद्यावर सामाजिक न्याय विभागाची नुकतीच बैठक झाली. आंतरजातीय विवाह योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार रिंकू राजगुरूच्या नावाचा विचार करत आहे. मात्र, रिंकू अल्पवयीन असल्यामुळे हा निर्णय राज्य सरकारला अडचणीत आणू शकतो.
दरम्यान, एका वाहिनीच्या मुलाखतीदरम्यान रिंकूला यासंबंधी विचारणा करण्यात आली. त्यावर आपण यासंबंधी पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे रिंकूने सांगितले. रिंकू दहावीत गेलेली १६ वर्षांची मुलगी आहे. ती अजून अल्पवयीन आहे. आंतरजातीय विवाह याबाबत तिला स्वतःला पुरेशी अशी माहिती नाही. असे असताना रिंकू राजगुरुला आंतरजातीय विवाह योजनेचा ब्रॅण्ड अँम्बेसेडर बनवणं कितपत योग्य आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा