प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट हा चित्रपट प्रदर्शित होऊन ६ वर्षे उलटली आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. या चित्रपटातील काही सीन तर प्रेक्षकांमध्ये एवढे लोकप्रिय झाले होते की त्याची जोरदार चर्चा झाली होती. या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेल्या सल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेख हा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच अरबाज शेखने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पुण्यातील एक रिक्षाचालकाचा त्याला कशाप्रकारे मनस्ताप झाला याबद्दल लिहिले आहे. यात त्याने रिक्षाचा पाठमोरा फोटो आणि नंबरही शेअर केला होता. यासोबत रिक्षा चालकाने अरेरावी करत शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. या सर्व आरोपांवर आता त्या रिक्षाचालकाने स्पष्टीकरण दिले आहे. आसिफ मुल्ला अरबाज असे या रिक्षा चालकाचे नाव आहे.

“सप्तरंगी प्रेमाचा नवा रंग घेऊन येतेय…”, रिंकू राजगुरुच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर पाहिलंत का?

अभिनेता अरबाज शेखने केलेली ही पोस्ट व्हायरल झाली होती. त्यावरुन त्या रिक्षा चालकावर अनेकांना टीका करण्यास सुरुवात केली होती. यावर नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलताना रिक्षाचालक म्हणाला, “अरबाजच्या पोस्टमुळे मला बाहेर पडणं देखील कठीण झाले आहे. अरबाजने धायरी फाट्याजवळ रिक्षा बुक केली होती. तिथून त्याला पुण्यात जाऊन ट्रेन पकडायची होती. त्यासाठी १९८ रुपये आकारण्यात येणार होते. मी गुगल मॅपच्या मदतीने रिक्षा ही भिडे पुलाजवळ नेली. मात्र पुलावर नदीचे पाणी वाढले होते. त्यामुळे पोलिसांनी तो रस्ता बंद केला होता.”

“मात्र काही जण धोका पत्करुन तो पूल ओलांडत होते. अरबाजची सहाची ट्रेन होती, असे त्याने मला सांगितले. त्यामुळे मी भिडे पुलावरुन रिक्षा घेतली. पण पाण्याचा प्रवाह वाढल्याने मला रिक्षा पाण्यात न्यायची नव्हती. समोर धोका असताना एवढं मोठं संकट उभं असताना मी ती रिक्षा कशी पाण्यात नेणार होतो? त्यावरुन तुम्ही इथून जाऊ शकता फक्त एवढंच त्याला म्हटलं. मी अरबाजला खाली उतर असं कधीच म्हटलं नव्हतं. जर स्टेशनपर्यंत जायचं असेल तर आपल्याला मार्ग बदलावा लागलं. पण त्या बदल्यात तुम्हाला पैसे वाढवून द्यावे लागतील असं म्हटलं. मग रिक्षा आप्पा बाळवंत चौकातून कुंभरवाड्यातून स्टेनशनवर नेली. त्यांनी मला पैसे पे केले आणि निघून गेले.”

मी त्यांना शिवी वगैरे काहीच दिली नव्हती. त्यांनी हा खोटा आरोप माझ्यावर लावला आहे. माझी आजपर्यंत कंपनीकडे तक्रार गेलेली नाही. फक्त नदीचं पाणी वाढल्यामुळे मी रिक्षा आत न्यायला नकार दिला होता. अरबाजच्या मित्राने रिक्षा बुक केली होती. त्यावेळी अरबाजच्या तोंडावर मास्क होता. त्यामुळे मी त्याला ओळखलं पण नाही. जेवढ्या लवकर शक्य होईल, तेवढ्या लवकर त्यांना मी स्टेशनला पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

#SairatMania : .. म्हणून अरबाजवर आली रडण्याची वेळ!

अरबाजच्या पोस्टनंतर मला सगळ्यांचे फोन यायला लागले. माझ्या घरी देखील वातावरण खूप टेन्शनमध्ये होतं. मला बाहेर पडायला देखील आता कठीण झालं आहे. मी असिफ मुल्ला अरबाजला एवढंच म्हणतो की त्यांना मी शिवी दिलेली नाही. जर दिली असती तर मी तुम्हाला सॉरी नक्कीच म्हटलो असतं, असेही त्या रिक्षावाल्याने सांगितले.