दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटांच्या इतिहासात अभूतपूर्व यश मिळवलं. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीमधील कमाईचे सारे विक्रम मोडले. या चित्रपटातील गाणी वाजली नाहीत असं एकही गाव महाराष्ट्रात सापडणार नाही असं म्हटलं जातं. गाणी, कथानक आणि मांडणी याचबरोबरच चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयामुळे हे यश मिळालं. या चित्रपटामधून आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरु, परश्याची भूमिका साकारणारा आकाश ठोसर आणि परश्याच्या मित्रांच्या भूमिकेतील अरबाज शेठ, तानाजी गालगुंडे हे चौघेही प्रचंड लोकप्रिय झाले. या चोघांनाही प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. या एका चित्रपटाने अनेकांची करियर सेट केली. विशेष म्हणजे या चित्रपटात ‘लंगड्या’ची भूमिका साकारणारा तानाजी आता पुन्हा चर्चेत आलाय आणि तो ही चक्क न्यूड फोटो शूटमुळे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बसला की नाही धक्का पण हे खरं आहे. तानाजीचा एक फोटो नुकताच समोर आला असून यामध्ये तो न्यूड म्हणजेच नग्नावस्थेत दिसून येत आहे. रावण प्रोडक्शनच्या एका विशेष कॅलेंडरसाठी तानाजीने हे फोटोशूट केलं आहे. फोटोमध्ये तानाजीने हातात गिटार पकडली आहे. सैराटमध्ये ग्रामीण भागामधील एका हुल्लड पोराची भूमिका साकारणाऱ्या तानाजीचा हा बोल्ड अंदाज पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. पॉझिटिव्ह बॉडी म्हणजे शारीरिक व्यंग असणाऱ्यांकडे सरात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे असं सांगणारा पॉझिटीव्ह बॉडी हा विचार घेऊन हे फोटोशूट करण्यात आलं आहे. या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये तानाजीचं एक वाक्य वापरण्यात आलं आहे. “माझे पायांची रचना योग्य नाहीय पण माझं संगीत नक्कीच आहे. मी माझ्या संगीत रचनेच उत्तम आहे कारण ते मी साकारलंय,” अशा आशयाचा संदेश असणारी ओळ शेअर करण्यात आलीय. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजर नेरुरकरने हा फोटो काढलाय.

काही दिवसांपूर्वी हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरातनेही याच कॅलेंडरसाठी अशाच पद्धतीचं न्यूड फोटोशूट केलेलं. त्यावरुन सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा रंगल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. वनितानेही बॉडी शेमिंग करणाऱ्या, शरीराच्या रचनेवरुन हिणवणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी हे फोटोशूट केलेलं. वनिताच्या या बोल्ड फोटोशूटमधून चाहत्यांमध्ये मतमतांतरे पहायला मिळाली. मात्र वनिताने आपल्या या बोल्ड फोटोशूटचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं होतं. वनिताप्रमाणेच आता त्याच थीमवर आधारित फोटोशूट तानाजीने केल्याचं पहायला मिळतंय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sairat fame tanaji galgunde bold nude photoshoot for body positivity movement scsg