सैराट चित्रपटामुळे आर्ची आणि परश्या अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांचे प्रचंड चाहते झाले आहेत. हे दोघेही एका कार्यक्रमानिमित्त नाशिकला गेले होते. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या गोंधळामुळे तो कार्यक्रमच रद्द करण्याची नामुष्की पोलिसांवर आली.
धन्वंतरी महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनातील फॅशन शोसाठी सैराटची ही जोडी उपस्थित होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी हे दोघेही पोहोचताच नागरिकांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे आयोजकांना आणि पोलिसांना कार्यक्रम थांबवावा लागला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून रिंकू आणि आकाशला त्या ठिकाणी फक्त दोन मिनिटेच थांबता आले. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sairat fane rinku rajguru and akash thosar leaves the stage in two minutes at nashik