नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. मात्र चित्रपटाचा शेवट पाहून झिंगाट झालेल्यांना अक्षरश: धक्काच बसतो. हा शेवटचा सीन कसा चित्रीत केला गेला याबाबतचे गुपित नागराजने उघड केले आहे.
चित्रपटाच्या शेवटी लहान मुलावर चित्रीत करण्यात आलेले दृश्य प्रेक्षकांना आश्चर्यचकित करून टाकते. या दृश्यातील लहान मुलाचे खरे नाव शिवम मोरे असे आहे. एवढ्या छोट्याशा मुलाने इतका चांगला अभिनय कसा केला असावा, हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात नक्कीच डोकावला असेल नाही का? तर याविषयी बोलताना नागराज म्हणाला की, आम्ही चित्रपट केला. मात्र, शेवट करण्यासाठी मोठी कसोटी होती. त्यासाठी लहान मुलाचा शोध सुरु होता. हा सीन कसा करायचा हा प्रश्न होता. मुलगा मिळाला. मात्र, त्याच्याकडून अभिनय करुन घेणे मोठे आव्हान होते. डोक्यात विचार सुरु होते. त्या मुलापासून त्याचे आई-बाबा लांब गेले होते. त्यासाठी त्याला रडताना दाखवायचे होते. मात्र, लहान मुलाला कसे रडवायचे? यावर विचार सुरु झाला. त्या बाळाच्या सर्व आवडीनिवडी आम्ही जाणून घेतल्यावर त्याला गाड्यांची आवड असल्याचे कळले. त्याच्याजवळ गाडी नेली की त्यावेळी तो चिमुकला हसायचा आणि जेव्हा ते गाडी दूर नेली की तो रडायचा. असं करत करत तो सीन आम्ही शूट केला.
रिंकूच्या शेजारणीचा रोल त्याच्या आईलाच दिला. त्यामुळे शेवटी तो त्याच्या आईकडे शेवटी रडत जात होता.

Story img Loader