हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय असलेल्या ‘द कपिल शर्मा शो’ची टीम देखील झिंगाट गाण्यावर सैराट होऊन धम्माल करताना पाहायला मिळणार आहे. कारण, मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवूडलाही ‘याड लावलेल्या’ दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटाची टीम लवकरच विनोदवीर कपिल शर्मा याच्या टेलिव्हजन शोमध्ये उपस्थिती लावणार आहे. ‘सैराट’ने मराठी चित्रपटसृष्टीत कमाईचा नवा विक्रम प्रस्थापित केला असून, परशा-आर्चीच्या प्रेमकहाणीला सर्वांनी डोक्यावर घेतले आहे. नुकतेच या चित्रपटाचे दुबईत देखील दमदार शो झाले. तेथेही ‘सैराट’ने सर्वांना ‘झिंगाट’ करून सोडले. ‘सैराट’च्या या यशाची दखल आता हिंदी टेलिव्हिजनने देखील घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कपिल शर्माचा शो’ हा हिंदी चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी ओळखला जातो. पण आता त्याच्या शोमध्ये पहिल्यांदा एखाद्या मराठी चित्रपटाचे कलाकार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या शोमध्ये काय धम्माल पाहायला मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे.
दरम्यान, कपिल शर्माच्या कार्यक्रमात ‘सैराट’ची टीम उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाले असले तरी कार्यक्रमाचे चित्रीकरण अद्याप झालेले नाही. यासोबतच हा कार्यक्रम केव्हा टेलिकास्ट केला जाणार याबाबतचीही माहिती समोर आलेली नाही.