‘झिंगाट झालं या…’,’आताच बया का बावरलं….’, ह्या आगामी सैराटच्या सर्वच गाण्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच धुमाकूळ घातला आहे. ह्या बहुचर्चित चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले.  या पोस्टरमध्ये चित्रपटातील मुख्य कलाकारांची झलक पाहावयास मिळते.
प्रदर्शनापूर्वीच बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकलेल्या या चित्रपटाने बरीच प्रशंसा मिळवली आहे. चित्रपटाद्वारे समाजातील जातीयव्यवस्थेवर प्रकाशझोत टाकणारा सृजनशील दिग्दर्शक नागराज मंजुळेचा ‘सैराट’ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘सैराट’ ही ‘फॅन्ड्री’प्रमाणेच ग्रामीण भागावर आधारित आगळी प्रेमकथा आहे. ‘सैराट’ सिनेमाची कथा, पटकथा, दिग्दर्शन आणि निर्मिती ही सर्व धुरा नागराज मंजुळेनेच सांभाळलीय. ‘सैराट’ येत्या २९ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा