महाराष्ट्रात सध्या प्रत्येकावर ‘सैराट’ची ‘झिंग’ चढलेली आहे. चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले असून, चित्रपटातील गाण्यांसह, संवाद आणि काही निवडक सीन देखील जोरदार चर्चेत आहेत. चित्रपटातील गाण्यांवर संपूर्ण महाराष्ट्र ‘झिंगाट’ होऊन नाचत असतानाच चित्रपटातील संवादांनीही प्रेक्षकांना ‘याड लावलं’ आहे.
दुसरीकडे नेटिझन्सला केव्हा काय सुचेल याचा नेम नसतो. सोशल मीडियावर सध्या सैराट चित्रपटावरील काही जोक्स देखील धुमाकूळ सुरू आहे, तर चित्रपटात चित्रीत करण्यात आलेले काही सीन्स विनोदी अंदाजात सादर केले जात आहेत. ते चांगले व्हायरल होत आहेत आणि प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरत आहेत. या व्हिडिओजवर लाईक्स आणि शेअरचा पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. चित्रपटातील ‘याड लागलं’ गाण्यात परशाचा विहिरीत उडी मारतानाच्या सीनला चांगली पसंती मिळाली होती. याच सीनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका गावातील काही मित्रांनी केलेला हा ‘सैराट’पणा खुद्द चित्रपटातील अभिनेता आकाश ठोसर याने आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे.

Story img Loader