संपूर्ण महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातल्यांनतर दिग्दर्शक नागराज मंजुळेचा ‘सैराट’ चित्रपट दुबाईवारीसाठी सज्ज झाला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम प्रस्थापित केलेल्या या चित्रपटाचे दुबईत शो होणार असून दुबईकर देखील ‘सैराट’ची आतुरतेने वाट पाहत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुबईमध्ये २६, २७ आणि २८ मे रोजी ‘सैराट’चे शो होणार आहेत, तर २७ मे रोजी विशेष स्क्रिनिंग होणार आहे. दुबईत एकूण २२ शो होणार असल्याची माहिती देणारे पोस्टर ‘सैराट’च्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात ‘सैराट’ चिपत्रपटाने ६० कोटींच्या कमाईचा आकडा गाठला असून, एका मराठी चित्रपटाने केलेली ही आतापर्यंतची विक्रमी कमाई आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात दिग्दर्शक नागराज मंजुळेसह संपूर्ण टीमचे अभिनंदन केले जात आहे.

Story img Loader