मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘सैराट’ची जोरदार हवा आहे. केवळ चित्रपटगृह नव्हे तर कट्टयावर रंगणाऱया गप्पा आणि सोशल मीडियावरही ‘सैराट’ सध्या फिव्हर पाहायला मिळत आहे. त्यात नेटीझन्स काय करतील याचा नेम नसतो. नुकेतच अजय-अतुलच्या ‘झिंगाट’ गाण्याचे बॉलीवूड व्हर्जन एका नेटीझनने फेसबुकवर पोस्ट केले होते. आता ‘सैराट’मधील काही निवडक क्षण वाळूशिल्पाच्या माध्यमातून दाखवून देणारा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल होत आहे. ‘बिईंग मराठी’ या फेसबुक पेजने हा व्हिडिओ पोस्ट केला असून यात वाळूशिल्पकार प्रसाद सोनावणे ‘सैराट’मधील परशा-आर्चीच्या प्रेमकथेतील काही महत्त्वपूर्ण क्षण रेखाटताना दिसतो.
(सौजन्य- बिईंग मराठी फेसबुक पेज, वाळूशिल्पकार- प्रसाद सोनावणे)