बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) शो लॉक अप (Lock Upp) प्रदर्शित झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. स्पर्धक त्यांच्या आयुष्यातील अनेक धक्कादायक किस्से सगळ्यांसोबत शेअर करताना दिसतात. या सगळ्यात स्पर्धक सायशा शिंदेने (Saisha Shinde) तिचे एक सिक्रेट सांगितले आहे. यावेळी तिने एका कपलसोबत ‘थ्रूपल रिलेशनशिप’ (Throuple Relationship)मध्ये असल्याचे सांगितले. तर सायशा होण्याआधीपासून त्या कपलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा तिने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पायल रोहतगीशी बोलताना सायशा म्हणाली, “मला आठवतंय की मी त्यांना पाच सिक्रेट सांगितले होते आणि शेवटचं थ्रुपालबद्दल होतं. मी एका बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि मी राणीसारखी राहत होते. ते दोघेही एकमेकांवर जितके प्रेम करत होते त्यापेक्षा जास्त प्रेम त्यांनी माझ्यावर केले.”

आणखी वाचा : “आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : “वा राजसाहेब वा, बऱ्याच काळाने…”, राज ठाकरेंच्या भाषणावर शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया

सायशा पुढे म्हणाली, “ही गोष्ट सायशा होण्यापूर्वीची आहे. मी जेव्हा सायशा बनले तेव्हा मी स्वतःला जास्त एक्सप्लोर (Explore) केले नाही. त्या वेळी मी कोणाच्याही समोर मेकअपशिवाय जाऊ शकेन की नाही अशा अनेक गोष्टी मला सतावत होत्या. कारण मेकअपशिवाय माझे पुरुषत्व दिसेल.”

आणखी वाचा : “क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले!”, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी वादावर हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत

सायशा तेव्हा स्वप्नील शिंदे होती आणि स्वत:ला गे म्हणजे समलैगिंक मानत होती. जेव्हा सायशा बनण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला किती मानसिकदृष्ट्या संघर्ष करावा लागला हे सांगितले. लॉक अपमध्ये तिचा आत्मविश्वास वाढल्याचे सांगत सायशा म्हणाली, “आता संपूर्ण जगाने मला मेकअपशिवाय पाहिले आहे. या शोने माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल मी किती आभारी आहे हे मी व्यक्त करू शकत नाही.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saisha shinde reveals in lock upp that she was in throuple relationship with girlfriend and boyfriend dcp