‘हे बेबी’, ‘हाऊस फुल’, ‘हमशकल’ यांसारख्या चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खान याच्यावर अभिनेत्री सलोनी चोप्राने लैंगिक आणि मानसिक छळाचे आरोप केल्यानंतर आणखी एक अभिनेत्रीने साजिदवर आरोप केले आहेत.

‘इंडियन एक्सप्रेस’नुसार, २०१४ साली प्रदर्शित झालेल्या रेंसिल डी’सिल्वा दिग्दर्शित ‘उंगली’ या चित्रपटातील अभिनेत्री रॅचेल व्हाइटने साजिद खानवर गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. साजिदने मला फोन करुन अश्लील वक्तव्य केल्याचं रॅचेलने म्हटलं आहे.

‘साजिद खानचं बॉलिवूडमध्ये मोठं नाव असेल. मात्र प्रत्यक्षात तो एक गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती आहे. साजिदने माझ्यासोबत जो अन्याय केला आहे त्या अन्यायाला मला वाच्या फोडायची होती. परंतु माझ्यात तेवढी हिंमत नव्हती. जेव्हा सलोनी चोप्राने तिच्यावर झालेल्या अन्यायचं कथन केलं तेव्हा हीच खरी वेळ असल्याचं समजून मी झालेले अन्यायला ट्विटरच्या माध्यमातून वाच्या फोडण्याचा निर्णय घेतला.  चित्रपटामध्ये काम मिळविण्यासाठी माझी धडपड सुरु असताना मला साजिद खानच्या ‘हमशकल’ या चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. तेव्हा मी साजिदसोबत पहिल्यांदा फोनवर बोलले. या पहिल्याच चर्चेमध्ये साजिद यांनी माझ्याशी अश्लील भाषेत बोलण्यास सुरुवात केली. ‘हॅलो बंगाल टाइग्रेस ! तुम्ही बंगाली मुली फार मादक असता’, असं साजिद यांचं पहिलं वाक्य होतं. त्यानंतरही त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये अश्लील शब्दांचा भरणा होत होता’, असं रॅचेल म्हणाली

पुढे ती असं म्हणाली, ‘या प्रकारानंतर हे प्रकरण पुढे वाढतच गेलं. एकदा साजिद यांच्या घरी कोणी नसताना त्यांनी मला घरी बोलावलं आणि मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. साजिद यावरच न थांबता त्याने गुप्तांगाविषयीही प्रचंड वाईट आणि अश्लील वक्तव्य करण्यास सुरुवात केली’.

दरम्यान, रॅचेलपूर्वी अभिनेत्री सलोनी चोप्रानेही साजिदवर लैंगिक आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. सलोनीने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अन्यायाला वाच्या फोडली असून साजिद तिच्याकडे अश्लील फोटोंची मागणी करत असल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader