अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या ‘हेरा फेरी’ या धमाल सिनेमाने नुकतीच 21 वर्ष पूर्ण केली. या निमित्ताने सोशल मीडियावर सिनेमातील फेमस दृश्यांवरील अनेक मीम्स व्हायरल झाले होते.

तब्बल 21 वर्षांनंतर राजू, श्यामसोबत प्रेक्षकांना बाबूरावची धमाल कॉमेडी पाहायला मिळणार आहे. सिनेमाला 21 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. या सिनेमाची स्क्रिप्ट तयार असून लवकरच ते या सिनेमाचं शूटिंग सुरू करणार आहेत.

पिंकविलाशी बोलताने ते म्हणाले आहेत की, लवकरच ते अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्यासोबत ‘हेरा फेरी-3’ या सिनेमावर काम सुरू करणार आहेत. फक्त ‘हेरा फेरी-3’ नाही तर या मालिकेत ते इतर सिनेमांचादेखील समावेश करणार आहेत ज्याचं नाव ‘हेरा-फेरी’ या सिनेमाशी जोडलेलं असेल. ते म्हणाले “जेव्हा बनेल तेव्हा 2-3 हेरा फेरी एकत्र बनतील”. म्हणजेच यापुढे ते या सिनेमाचे अनेक भाग चाहत्यांसाठी घेऊन येणार आहेत.पुढे ते म्हणाले, “या सुपरहिट सिनेमांनंतर या सिनेमांच्या सिक्वलसाठी मोठी जबाबदारी आहे. कारण पुढील भागांमध्ये देखील उत्तम स्क्रिप्ट, डायलॉग आणि स्क्रिनप्ले असणं महत्वाचं असूव यावर लक्ष केद्रित करणं गरजेचं आहे.”

काय पाहायला मिळणार ‘हेरा फेरी-3’ मध्ये?

यासोबच त्यांनी ‘हेरा फेरी 3’ मध्ये प्रेक्षकांना काय पाहयला मिळेल याची देखील कल्पना दिली. जिथं ‘हेरा फेरी 2’ संपतो तिथून पुढील सिनेमाला सुरुवात होईल. त्यामुळे ‘हेरी फेरी 2’ च्या शेवचाचं रहस्य हे पुढील भागात म्हणजेच ‘हेरा फेरी 3’ मध्ये उलगडणार आहे. तर ‘हेरा फेरी 3’ मध्ये पुन्हा परेश रावल आणि सुनील शेट्टीची धमाल पाहायला मिळणार आहे. या सिनेमातील अक्षयच्या भूमिकेचं रहस्य मात्र अद्याप उलगडलेलं नाही. तो या सिनेमात झळकणार की नाही हे अद्यार स्पष्ट झालेलं नाही. शिवाय आता चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती या सिनेमाच्या अधिकृत घोषणेची.

‘हेरा फेरी ‘ आणि ‘ फिर हेरा फेरी ‘ या दोन्ही सिनेमांनी प्रेक्षकांना पोटधरून हसायला लावलं होतं. कॉमेडी सिनेमांच्या यादीत या सिनेमाने एक नवी ओळख निर्माण केली होती. तर या सिनेमातील राजू, श्याम आणि बाबूराव या पात्रांनी तर लोकं आजही विसरलेले नाहित.

Story img Loader