एखाद्याच्या गंभीर आजारावरील सिनेमा, नाटक किंवा एखादी लेखनकृती हास्यस्फोटक, आनंददायी असू शकते? अर्थातच.. नाही. यावर कुणी वादाकरता ‘आनंद’ सिनेमाकडे खचितच निर्देश करील. त्यात राजेश खन्ना कसा हसत हसत आपल्या दुर्धर आजाराला सामोरा गेला, वगैरे म्हणेल. ते खरंही असलं, तरी त्या सिनेमात वेदनेची एक किनार सतत पाश्र्वभूमीला होतीच. हसतखेळत आयुष्य जगण्याचा केलेला तो दिखावा आहे, हे काही केल्या विसरता येत नव्हतं. आपल्या वेदना इतरांना जाणवू नयेत याकरता घेतलेला मुखवटा! असाध्य आजाराला काही माणसं मोठय़ा धैर्यानं सामोरी जात असली आणि तशाही स्थितीत आयुष्य रसरसून जगत असली, कर्तृत्वाची नवी क्षितीजं काबीज करीत असली, तरी त्यांना आतून पक्की जाणीव असते, की हे सारं  लवकरच संपणार आहे. आपण काही दिवसांचेच सोबती आहोत. त्यांनी प्रकटरीत्या दर्शवलं नाही तरी मृत्यूची जाणीव त्यांना सतत सोबतीला असतेच. फक्त ते ती व्यक्त करीत नाहीत, एवढंच.

मधुमेह हा आजार आज जगभरात मोठय़ा प्रमाणावर वाढतो आहे. वर वर पाहता त्याचे दृश्य परिणाम प्रारंभी जाणवत नसले, तरी शरीरात ते होतच असतात. मधुमेह माणसाला पोखरत जातो आणि एके दिवशी असा काही हिसका दाखवतो, की तोवर बऱ्याचदा उशीर झालेला असतो. म्हणूनच मधुमेहाची वेळीच दखल घेऊन तो आटोक्यात ठेवणं गरजेचं असतं. अनेकांना याची जाणीव आत्ता-आत्तापर्यंत नव्हती. परंतु आता मधुमेहासंबंधी होत असलेला सार्वत्रिक प्रचार आणि लोकांना आलेलं आरोग्यभान यामुळे त्यासंबंधीची जागरूकता वाढीस लागली आहे. हा आजार काहींच्या बाबतीत आनुवंशिक असतो, तसंच आधुनिक जीवनशैलीचाही तो परिपाक आहे. म्हणूनच त्याकडे गांभीर्यानं पाहण्याची आवश्यकता आहे. मधुमेहींना सजग करण्यासाठी आरोग्यविषयक प्रकाशनं, शासकीय व खासगी प्रचार मोहिमा, वृत्तपत्रं-नियतकालिकांतून प्रसिद्ध होणारे लेख आपल्या परीनं प्रयत्नरत असले तरी आपल्याकडे अद्याप एक मोठा वर्ग असा आहे- जो मधुमेहाच्या दुष्परिणामांबद्दल अनभिज्ञ आहे. अशांना या आजाराच्या गांभीर्याची जाणीव करून देत असतानाच जगण्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी देणारी रंजक नाटय़कृती लेखक विद्यासागर अध्यापक यांनी ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाद्वारे पेश केली आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांनी हे नाटक दिग्दर्शित केलेलं आहे. ‘एक शुगरकोटेड ब्लॅक कॉमेडी’ असं त्याचं जे वर्णन केलं गेलंय. शंभर टक्के ते सत्य आहे.

in pune people has disease of traffic rule breaking in city
नवा शहरी रोग !
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Man putting hand inside crocodiles mouth crocodile shocking video
VIDEO: “कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, तरुणानं मगरीबरोबर केलेलं कृत्य पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?
Parents make children read a book before going to bed at night know the benefits of reading a book
पालकांनो, रात्री झोपण्यापूर्वी मुलांना लावा पुस्तक वाचण्याची सवय, जाणून घ्या पुस्तक वाचण्याचे फायदे!
dhane
रात्रभर भिजवलेल्या धण्याचे पाणी प्यायल्याने छातीतील तीव्र जळजळ कमी होते का? तज्ज्ञांनी सांगितले फायदे आणि तोटे
Loksatta editorial Narendra modi statement Karnataka govt arrested ganesh murti congress
अग्रलेख: कर्मभूमीतील धर्मकसोटी!
man stabbed due to drunken argument one arrested for attempted murder
दारु पिताना झालेल्या वादातून मेहुण्याला भोसकले, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास अटक
interest and curiosity while making a documentary
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आस्था आणि कुतूहलासाठी…

विलासराव हे गृहस्थ मधुमेहाचे पेशंट असल्याचं निदान होतं आणि त्यांची पत्नी माधवी त्यांच्यावर पथ्यपाण्याचे अनेक र्निबध घालते. सरकारी विमा कंपनीत उच्चाधिकारी असलेले विलासराव अधिक कमाईच्या लालसेनं खासगी विमा कंपनीत नोकरी पत्करतात आणि मग तिथल्या ‘टार्गेट’च्या चक्रव्यूहात अडकतात. कंपनीने दिलेली विम्याची टार्गेट्स पुरी करता करता त्यांच्या नाकी नऊ येतात. टार्गेटच्या अतिरेकी दडपणामुळे आणि जनसंपर्काचं मिषाने रोज पाटर्य़ा झोडण्याने ते मद्याचे व्यसनी होतात. परंतु त्यामुळे मानसिक ताणतणाव कमी होण्याऐवजी अधिकच वाढत जातात आणि ते मधुमेहाचे रुग्ण होतात.

[jwplayer itkTOSml]

अशात त्यांची मुलगी ऋचा हिचं ‘बाहेरख्याली’ वर्तन वाढत चालल्याचं वर्तमान माधवी त्यांच्या कानी घालते. त्यानं विलासराव खडबडून भानावर येतात. ऋचाला तिच्या वर्तनाचा खडसून जाब विचारतात. परंतु तिनं दिलेल्या बिनदिक्कत उत्तरांनी त्यांचा रक्तदाब आणखीनच वाढतो. तिची ही झाडाझडती सुरू असतानाच ओंकार हा ऋचाचा मधुमेहतज्ज्ञ मित्र अचानक त्यांच्या घरी येतो. विलासराव मधुमेही असल्याचं कळल्यावर तो त्यांची ‘शाळा’च घेतो. पथ्यपाणी, मेडिटेशन वगैरेंच्या  माधवीच्या ससेमिऱ्याने आधीच कावलेले विलासराव ओंकारला हडतहुडूत करून चक्क हाकलून देतात. पण ऋचाच्या हट्टामुळे तिला मागणी घालण्यासाठी तो पुन्हा एकदा येतो. त्याचा हेतू जाणून ऋचा स्वत:च त्याला लग्नास नकार देईल अशा तऱ्हेनं विलासराव तिला भडकवतात. त्यातून सो-कॉल्ड आत्मभान आलेली ऋचा ओंकारला लग्नाला नकार देते. मात्र, त्यानंतर आपण ओंकारपासून गरोदर असल्याचा बॉम्बस्फोट करून ती  घरातल्यांनाही हादरवते. वर या बाळाला आपण जन्म देणार असल्याचंही ती जाहीर करते. आधी ओंकारविरुद्ध ऋचाला फितवणारे विलासराव या वार्तेनं पार हबकतात. परतीचे दोर त्यांनीच कापून टाकलेले असल्यानं ओंकारला तिच्याशी लग्न करायला राजी करणं आता अवघड असतं. माधवी तर लेकीच्या या कर्मानं हतबलच होते. तेव्हा लेकीला गर्भपाताचा सल्ला देऊन विलासराव तिचं दुसऱ्याच एका तरुणाशी लग्न लावून देण्याचा घाट घालतात. पण..

लेखक विद्यासागर अध्यापक यांनी मधुमेह केन्द्रस्थानी ठेवून रचलेलं हे नाटक चक्क विनोदी.. ब्लॅक कॉमेडी शैलीत आहे. मधुमेहाबद्दल जागृती करण्याचा वगैरे पवित्रा न घेता त्याची गंभीरता हसत-खेळत प्रेक्षकांच्या मनावर िबबवण्याचा यत्न या नाटकात केला गेला आहे. वरकरणी पाहता वास्तवदर्शी वाटणारं हे नाटक कृष्णसुखात्मिकेच्या अंगानं धमाल उलगडत जातं. माधवीच्या भूमिकेतील शुभांगी गोखले यांनी अर्कचित्रात्मक शैलीतून ते अधिकच ठाशीव केलं आहे. या नाटकात वास्तवदर्शी शैली आणि ब्लॅक ह्य़मुर यांचं एकजीव संयुग आढळून येतं. नाटकातील घटना तुम्हा-आम्हा कुणाच्याही जीवनात घडणाऱ्या असल्या तरी त्यांची हाताळणी इथं वेगळ्या तऱ्हेनं केली गेली आहे. विरोधाभासी विनोदाचे चपखल नमुने यात आपल्या प्रत्ययास येतात.

यानिमित्तानं दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि अभिनेते प्रशांत दामले ही जोडी पहिल्या प्रथमच या नाटकात एकत्र आली आहे. प्रशांत दामले यांची विशिष्ट अभिनयशैली आणि चंद्रकांत कुलकर्णी यांची दिग्दर्शनाची पद्धत यांचा मेळ न बसण्याच्या शक्यतेमुळेच बहुधा आजवर ते एकत्र आले नव्हते की काय, कुणास ठाऊक. या नाटकात त्यांचे सूर जुळले आहेत. हे नाटक मधुमेहासंबंधानं असलं तरी ते त्याबद्दल बोधामृत पाजणारं नाही. हट्टी, दुराग्रही माणसाच्या वर्तन-व्यवहारांतून मधुमेहाला कसा बढावा मिळू शकतो, एवढंच यात दुरान्वयानं सूचित होतं. खरं तर नाटकात माधवीच्या हायपर वागण्या-बोलण्यातून तीच मधुमेहाची शिकार आहे की काय असं वाटत राहतं. याउलट, विलासरावांच्या चिडण्या-संतापण्यावर त्यांचं बऱ्यापैकी नियंत्रण आढळतं. वास्तवदर्शी शैली आणि ब्लॅक कॉमेडीचं बेमालूम मिश्रण नाटकात आढळतं. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी संहितेतील प्रकट विनोदाच्या जागा बहारीनं काढल्या आहेतच; शिवाय त्यातल्या रिक्त जागाही त्यांनी विविध क्लृप्त्यांनी ‘बोलक्या’ केल्या आहेत. पात्रांमधील संवाद-विसंवाद, तसंच त्यांच्या विरोधाभासी वागण्या-बोलण्यातल्या गमतीजमती त्यांनी नेमकेपणानं टिपल्या आहेत. त्यामुळे तणावपूर्ण घटना-प्रसंगांतील ताण कमी न होतासुद्धा ते हास्यस्फोटक होतात. पण तरी त्यातलं गांभीर्य मात्र हरवत नाही. अतिशयोक्तीपूर्ण विनोदाचा मुक्त वापर नाटकात केला गेला आहे. ओंकारच्या गंभीर व्यक्तित्वासमोर विलासरावांचं काहीसं उच्छृंखल, बेमुर्वतखोर वर्तन खचितच उठून येतं. तीच गोष्ट ऋचा व ओंकारच्याही बाबतीत. नाटक चरमसीमेला पोचतं ते मात्र मानवी जीवनावरचं त्रिकालाबाधित सत्य मांडून. तोवर सुरू राहिलेल्या हल्ल्यागुल्ल्यातील छचोरपणा एका उदात्त, उन्नत नोटवर संपतो.. आणि आभाळ निरभ्र होतं.

प्रदीप मुळ्ये यांनी उभं केलेलं विलासरावांचं घर त्यांच्या आर्थिक स्तराची जाणीव देणारं आहे. किशोर इंगळे यांनी छायाप्रकाशाच्या खेळानं नाटकाची प्रकृती सांभाळली आहे. अशोक पत्कींचं संगीत नाटकाची मागणी पुरवणारं आहे. गुरू ठाकूर यांचं गीत गोड, श्रवणीय अन् मनाला शांतवणारं आहे.

विलासरावांच्या भूमिकेत प्रशांत दामले यांनी त्यांच्या नित्याच्या यशस्वी विनोदी अभिनयशैलीस काहीशी मुरड घातल्याचं प्रकर्षांनं जाणवतं. विशेषत: हशे वसूल करण्यासाठी पदरचे संवाद घेण्याचा मोह त्यांनी इथं टाळला आहे. विनोदाची शैली बदलली तरी त्यावरील त्यांची हुकमत मात्र उणावलेली नाही. नाटक खळाळतं राहतं ते त्यांच्या वाचिक, आहार्य अन् देहबोलीतून निर्माण होणाऱ्या हास्यस्फोटक विनोदांमुळेच. शुभांगी गोखले यांनी बुद्धय़ाच अर्कचित्रात्मक शैलीत माधवी साकारली आहे. विलासरावांच्या सारं काही ‘हसण्या’वारी नेण्याच्या पाश्र्वभूमीवर माधवीचं काळजीयुक्त नैतिक वर्तन यातल्या विनोदाला विरोधाभासी इंधन पुरवतं. ऋचाच्या भूमिकेत ऋचा आपटे नवखेपणामुळे थोडय़ा कमी पडतात. संकर्षण कऱ्हाडे यांनी ओंकारचा स्वर अचूक पकडला आहे. साधा, सरळमार्गी असलेला, परंतु नको त्या परिस्थितीत अकारण फसलेल्या ओंकारची हतबलता, सात्विक संताप त्यांनी पोटतिडकीनं व्यक्त केला आहे.

मधुमेहाच्या पाश्र्वभूमीवरचं हे गोड नाटक मुळीच चुकवू नये असंच आहे.

[jwplayer 2LHpW07p]