सिनेसृष्टीतील ताऱ्यांच्या मैत्रिपूर्ण नातेसंबंधात अनेकवेळा चढ-उतार पाहायला मिळतात. १९७० च्या काळात मोठा पडदा गाजविणारी शत्रुघ्न सिन्हा आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन याच्या जोडीतदेखील असेच काहीसे होते. ‘काला पथ्थर’, ‘नसीब’, ‘शान’ आणि ‘दोस्ताना’सारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून एकत्र काम केलेल्या या जोडीत कायम एक प्रकारची खदखद होती. याविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘जवानी थी, जोश था’ असे सांगत जास्त काही बोलण्याचे टाळले. परंतु, काळाच्या ओघात दोघांमधील मतभेत संपुष्टात आले असून, मैत्रीचा पूल बांधला गेल्याचे जाणवते. १८ जानेवारीला शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा कुशचा लग्नसोहळा मुंबईत पार पडला. या लग्नसोहळ्याला अमिताभ बच्चन यांनी उपस्थिती लावली होती. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी भावाच्या लग्नाला उपस्थिती लावल्याबद्दल शत्रुघ्न सिन्हांची कन्या आणि आजची आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने टि्वटरवरून या उभयतांचे आभार मानले.
दोस्ताना : शत्रुघ्न सिन्हाच्या मुलाच्या लग्नाला महानायकाची उपस्थिती
सिनेसृष्टीतील ताऱ्यांच्या मैत्रिपूर्ण नातेसंबंधात अनेकवेळा चढ-उतार पाहायला मिळतात. १९७० च्या काळात मोठा पडदा गाजविणारी शत्रुघ्न सिन्हा आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन याच्या जोडीतदेखील...
First published on: 19-01-2015 at 12:48 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजनManoranjanमनोरंजनEntertainmentशत्रुघ्न सिन्हाShatrughan Sinhaसोनाक्षी सिन्हाSonakshi Sinhaहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 4 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salaamat rahe dostaana amitabh bachchan attends shatrughan sinha son wedding