‘राधे श्याम’ व ‘आदिपुरुष’सारखे बिग बजेट चित्रपट फ्लॉप झाल्यावर प्रभासच्या आगामी ‘सालार’ची सगळेच आतुरतेने वाट बघत होते. केजीएफ फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासह प्रभास प्रथमच काम करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटात प्रभाससह पृथ्वीराज सुकुमारनचीही मुख्य भूमिका असल्याचं ट्रेलरमध्ये स्पष्ट झालं. ही गोष्ट दोन मित्रांच्या मैत्रीची असली तर त्याला बदल्याची चांगलीच फोडणी असल्याचं ट्रेलरवरुनही स्पष्ट होत आहे.

नुकत्याच हाती आलेल्या रीपोर्टनुसार ‘सालार’ला सीबीएफसी बोर्डकडून ‘ए’ सर्टिफिकेट मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. या चित्रपटात आपल्या मित्राला राजगादीवर बसू न दिल्याचा बदला घेणाऱ्या ‘देवा’च्या भूमिकेत आपल्याला प्रभास पाहायला मिळणार आहे. याबरोबरच प्रभासला अशा भूमिकेत आजवर कधीच पाहिलेलं नाही असा दावाही त्याने केला आहे. ‘दैनिक भास्कर’शी संवाद साधताना प्रभास म्हणाला, “प्रेक्षकांनी मला अशी भूमिका साकारताना आजवर पाहिलेलं नाही. मला या नव्या अवतारात पाहताना त्यांना नेमकं कसं वाटेल यासाठी मी फार उत्सुक आहे.”

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Navri Mile Hitlarla
“तुला माझ्यासाठी…”, सुनांच्या हट्टासाठी एजेने दिली शिक्षा; लीलाचा आनंद मात्र गगनात मावेना, पाहा प्रोमो
lure of marriage , pretending to be doctor,
सातारा : डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने अत्याचार, कराडमध्ये गुन्हा दाखल

आणखी वाचा : ६५ वर्षीय दर्शन जरीवालांवर महिलेचे गंभीर आरोप; अभिनेत्यासह विवाह केल्याचा अन् गरोदर असल्याचा खुलासा

चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही प्रचंड हिंसा आणि रक्तपात पाहायला मिळत आहे, अन् कदाचित यामुळेच या चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट मिळालं असल्याचं स्पष्ट होत आहे. या सगळ्यामागे एक उत्तम कथानक आणि योग्य भावना असल्याचा खुलासा प्रभासने केला आहे. याच मुलाखतीदरम्यान प्रभास म्हणाला, “बाहुबली सुद्धा एक हिंसक चित्रपट होता ज्यात मी एकट्याने १०० लोकांना मारलं होतं, परंतु तो चित्रपट अगदी लहान मुलांनीही पाहिला अन् त्याला आवडलादेखील. जात चित्रपटातील किंवा कथेतील भावना योग्य पद्धतीने सादर केल्या नसतील तरच चित्रपट हिंसक वाटू शकतो. ‘सालार’सुद्धा तसाच उत्तम आणि योग्य कथानक असलेला चित्रपट आहे, त्यातील प्रत्येक हिंसक सीनमागे सबळ भावना आहे.”

प्रभासच्या या चित्रपटाची प्रेक्षक प्रचंड आतुरतेने वाट बघत आहेत. ‘सालार’ २२ डिसेंबर २०२३ रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याच्या बरोबर एक दिवस आधी २१ डिसेंबरला शाहरुख खानचा बहुचर्चित ‘डंकी’ प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे वर्षअखेरीस बॉक्स ऑफिसवर जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे.

Story img Loader