बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ यांनी जवळपास ४० दशक चित्रपटसृष्टीला दिली आहेत. काल अमिताभ यांनी त्यांचा ७९ वा वाढदिवस साजरा केला. तरीही ते चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी असेच सतत सगळ्यांचे मनोरंजन करावे अशी इच्छा त्यांच्या चाहत्यांची आहे. मात्र, सलीम खान यांनी एका मुलाखतीत अमिताभ यांनी निवृत्ती घेतली पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

सलीम यांनी ‘दैनीक भास्कर’ला ही मुलाखत दिली होती. “अमिताभ यांनी आता निवृत्ती घ्यावी. त्यांना या आयुष्यात जे करायचे होते त्यांनी ते सगळं केलं आहे. त्यांनी आता आयुष्यातील काही वर्षे ही स्वतःसाठी देखील ठेवली पाहिजेत. अमिताभ यांनी त्यांच्या करिअरमध्ये खूप अप्रतिम काम केलं आहे. म्हणून त्यांनी आता या शर्यतीतून बाहेर पडायला हवे,” असे सलीम म्हणाले.

अमिताभ यांनी निवृत्ती का घेतली पाहिजे हे सांगत सलीम पुढे म्हणाले, “निवृत्ती म्हणजे ती व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार त्याच्या आयुष्यातील काही वर्षे जगू शकेल. आपल्या आयुष्यातील सुरुवातीची वर्षे आपण अभ्यास आणि शिकण्यात घालवतो. त्यानंतर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात. उदाहरणार्थ, माझे जग आता मर्यादित झाले आहे. मी ज्या लोकांसोबत फिरायला जातो ते सर्व चित्रपटसृष्टीतील नाही.”

आणखी वाचा : रकुल प्रीत सिंगने ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यासोबत फोटो शेअर करत दिली प्रेमाची कबुली

पुढे सलीम म्हणाले, “अमिताभ बच्चन हे हीरो होते आणि अजूनही आहेत, जे एका ‘अँगरी यंग मॅन’ची भूमिका साकारू शकत होते. मात्र, अमिताभसारख्या अभिनेत्यांसाठी आता कहाण्या नाहीत. आपले चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सुधारले आहेत, संगीत आणि अॅक्शन सुधारले आहे पण आपल्याकडे चांगल्या स्क्रिप्ट नाहीत. ”

आणखी वाचा : ‘कुंद्राला भेट…’, ब्रालेटमध्ये विमानतळावर पोहोचल्यामुळे उर्फी जावेद पुन्हा एकदा ट्रोल

दरम्यान, अमिताभ आणि सलीम यांनी एकत्र जवळपास १० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’ या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत जया बच्चन यांनी देखील काम केले होते. ‘शोले’, ‘दीवार’, ‘मजबूर’, ‘डॉन’, ‘त्रिशूल’, ‘काला पत्थर’ आणि ‘दोस्ताना’सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे.