कोणताही कलाकार आपल्यातील वेगळेपणा दाखविण्यासाठी आणि प्रेक्षकांना आपल्या चित्रपटाकडे आकृष्ट करून घेण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतो. बॉलीवूड ‘खान’दानातील सगळीच खान मंडळी त्यासाठी प्रसिद्ध आहेत.
बहुचर्चित आणि वादग्रस्त ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटासाठी अभिनेता सलमान खान याने असाच एक वेगळा फंडा अवलंबिला आहे. सलमान खानने या चित्रपटात चक्क बुरखा परिधान केला आहे. अर्थात, पुरुष कलाकाराने बुरखा परिधान करणे हे बॉलीवूडसाठी नवे नाही. कारण या अगोदरही अनेक चित्रपटांतून चित्रपटाच्या नायकाने काही ना काही कारणामुळे बुरखा परिधान केलेला असल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आहे.
हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे, त्यातील काही संवादांमुळे चर्चेत आहे. आता सलमानच्या बुरखा प्रकरणामुळे तो प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय झाला आहे. चित्रपटातील एका प्रसंगात सलमान अभिनेता नवाजउद्दीन सिद्दिकी याच्यासमवेत बुरखा घातलेला पाहायला मिळतो. तसेच अन्य एका प्रसंगात मोटारसायकलवरून जातानाही सलमानने बुरखा घातलेला आहे. चित्रपटात सलमानसह करिना कपूर प्रमुख भूमिकेत आहे. हे बुरखाधारी प्रकरण प्रत्यक्ष चित्रीकरणाच्यावेळी मात्र आपल्याला महाग पडल्याचे सलमानने म्हटले आहे.
बुरखा घातल्यानंतर समोरचं काही म्हणजे काही दिसत नाही. एक तर तो पायघोळ बुरखा घातल्यामुळे पाय एकमेकांत घुटमळून पडायला होत होते आणि या अवस्थेत चित्रीकरण करणे फारच किचकट होऊन बसलो होते, असे सलमानने सांगितले. बरं तर बरं दिग्दर्शक कबीर खानने बुरखा घालून अॅक्शन दृश्ये करायला सांगितली नाहीत, याबद्दलही सलमानने आभार मानले आहेत.
बुरखाधारी सलमान!
कोणताही कलाकार आपल्यातील वेगळेपणा दाखविण्यासाठी आणि प्रेक्षकांना आपल्या चित्रपटाकडे आकृष्ट करून घेण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतो.
First published on: 19-07-2015 at 02:11 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman in burkha