सलमानच्या आगामी ‘किक’ या चित्रपटात त्याची नवी तिनचाकी स्वारी पाहावयास मिळणार आहे. पण ही बाइक आहे? गाडी आहे? की दोन्ही आहे हे काही कळायला मार्ग नाही.
बॉलीवूडचा दबंग खान सध्या साजिद नादियवालाच्या किक चित्रपटासाठी राजपथ, दिल्ली येथे शूटींग करत आहे. त्याचवेळी, सलमान दिल्लीच्या रस्त्यांवर ही तिनचाकी गाडी चालविताना दिसला. त्याच्या मागच्या सिटवर जॅकलीन फर्नांडिस बसलेली होती. दिग्दर्शक नादियवालाने ही टू-इन-वन गाडी खास चित्रपटाच्या शूटींगकरिता मागविल्याचे सांगण्यात येत आहे. एखाद्या बग्गीसारखा या गाडीचा पुढचा भाग असून, मागचा भाग हा एखाद्या विंटेज कारसारखा आहे. गेले काही आठवडे या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीत सुरु आहे. २००९साली प्रदर्शित झालेल्या तेलगू चित्रपटाचा किक हा रिमेक आहे.

Story img Loader