सलमान खानचा ‘हम साथ साथ हैं’ चित्रपट गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये त्याची बहीण नीलमची एक लहान मुलगी दाखवण्यात आली होती. या चित्रपटातील लहान मुलीने आपल्या निरागसपणाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. चित्रपटातील सलमानची ही लहानशी भाची आता खूपच मोठी झाली असून तिच्या सौंदर्याने अनेकांना भुरळ पाडली आहे. ही छोटी मुलगी आता फॅशन क्षेत्रातील आघाडीची मॉडेल झाली असून तिचा ग्लॅमरस अंदाज पासून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या मोहक अदांनी चाहते घायाळ झाले आहेत. ‘हम साथ साथ हैं’मधील या गोंडस मुलीचे नाव ज़ोया अफरोज असे आहे.
ज़ोया आता २८ वर्षांची झाली आहे. ती पूर्णपणे बदलली असून तिला ओळखणे अतिशय कठीण आहे. ज़ोयाने वयाच्या तिसऱ्या वर्षी बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. बालकलाकार म्हणून तिने कहो ना प्यार है, मन, कुछ ना कहो, हम साथ साथ है यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोठी झाल्यावर झोयाने द एक्सपोज या थ्रिलर चित्रपटातून पदार्पण केले.
अभिनयानंतर ज़ोया आता सौंदर्यविश्वात आपली छाप सोडत आहे. ज़ोया खूप सुंदर आहे. तिचे सौंदर्य आणि ग्लॅमरस अवतारानेच तिला ब्युटी क्वीन बनण्यास मदत झाली आहे. ज़ोयाचे सौंदर्यविश्वात मोठे नाव आहे. तिने मिस इंडिया इंटरनॅशनल २०२१ चा खिताब जिंकला आहे. ज़ोया आता लवकरच जपानमध्ये होणार्या मिस इंटरनॅशनल २०२२ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ज़ोया अफरोज याआधी फेमिना मिस इंडिया २०१३ मध्ये सेकंड रनरअप राहिली आहे.