मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांनी रविवारी, ५ जून 2022 रोजी त्यांची भावी सून राधिका मर्चंटसाठी अरंगेत्रम (Arangetram) सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात चित्रपट आणि क्रीडा जगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

आणखी वाचा : “जॉनी डेपला ११६ कोटी रुपये नुकसान भरपाई देऊ शकत नाही…”, अँबर हर्डच्या वकिलाचे वक्तव्य चर्चेत

या सोहळ्याचे व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केले आहेत. सेलिब्रिटींमध्ये सलमान खान, आमिर खान, रणवीर सिंग, राजकुमार हीरानी, मीजान जाफरी, जहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी हजेरी लावली होती. या शिवाय राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे त्यांची आई रश्मी ठाकरे आणि भाऊ तेजस ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : “तरुण दिसण्यासाठी मी विष्ठा सुद्धा खायला तयार आहे”; अभिनेत्रीचे धक्कादायक विधान

अरंगेत्रम (Arangetram) समारंभ म्हणजे काय?

अरंगेत्रम हा एक असा सोहळा आहे ज्यामध्ये शास्त्रीय नृत्यांगना प्रथमच सर्वांसमोर रंगमंचावर सादरीकरण करते. हा एक तमिळ शब्द आहे, ज्याचा अर्थ शास्त्रीय नृत्यांगना औपचारिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्टेजवर सर्वांसमोर सादरीकरण करते.

आणखी वाचा : “असा चित्रपट करताना लाज वाटली पाहिजे…”, ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटावरून केआरकेने केली अक्षय कुमारवर टीका

राधिका मर्चंट ही उद्योगपती वीरेन आणि शास्त्रीय नृत्यांगना शैला मर्चंट यांची मुलगी आहे. ती बराच काळापासून शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेत होती. आता राधिकाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तिच्यासाठी अरंगेत्रम सोहळा आयोजित करण्यात आला होता. राधिका मर्चंटच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. तिच्या अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : IMDb नुसार हे आहेत भारतातील टॉप ८ कॉमेडी चित्रपट, तुम्ही यापैकी कोणते पाहिलेत?

आणखी वाचा : चित्रपटासाठी १०० कोटी मानधन घेणारा अक्षय एका जाहिरातीसाठी किती पैसे घेतो माहितये का?

आणखी वाचा : ‘रानबाजार’मुळे प्राजक्ता-तेजस्विनीला ट्रोल करणाऱ्यांना सचिन खेडेकरांनी दिलं उत्तर, म्हणाले “मराठी प्रेक्षक…”

आणखी वाचा : कोणत्या मराठी अभिनेत्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आवडली? सचिन खेडेकर म्हणाले…

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा २०१९ साली साखरपूडा झाला होता. तेव्हापासून ती अनेकदा अंबानी कुटुंबाच्या फंक्शन्समध्ये दिसली आहे.

Story img Loader