आज २७ डिसेंबरला अभिनेता सलमान खानचा वाढदिवस आहे. रात्री उशिरा त्यांने पनवेल येथील त्यांच्या फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा केला. रविवारी सलमान खानला साप चावला होता, त्यानंतर यावेळेस तो वाढदिवस साजरा करणार नाही अशी प्रतिक्रिया समोर येत होत्या. मात्र त्याची प्रकृती सुधारत आहे. त्यानंतर रात्री सलमानने आपला वाढदिवस कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत साजरा केला. यानंतर सलमान खान माध्यमांसमोर आला होता. त्याच्या फार्महाऊसबाहेर अनेक फोटोग्राफर्सची गर्दी जमली होती.

याबाबत सलमान खानचे वडील सलीम खान यांनी सांगितले की, “सलमान रात्री त्याच्या खोलीत होता आणि अचानक त्याच्या हाताला दुखू लागले. जेव्हा सलमानने ते पाहिले तेव्हा त्याला समजले की त्याला साप चावला आहे. पण तो साप विषारी नाही. अशात अशा परिस्थितीत, रुग्णालयात दाखल केल्यानंतर सलमानला इंजेक्शन देण्यात आले आणि काही तासांनंतर त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. सलमान खानच्या खोलीत साप कुठून आला हे माहीत नाही, पण साप पकडला गेला आणि नंतर जंगलात सोडण्यात आला.”

अभिनेता सलमान खानला सर्पदंश, पनवेलच्या फॉर्महाऊसवर घडली घटना

यावेळी सलमान खानने काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते. यासोबत त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि तपकिरी रंगाची पँट घातली होती. सलमानला गेटच्या बाहेर येताना पाहून एक फोटोग्राफर म्हणाला- ‘भाई, सुंदर स्माईल.’ सलमानाने त्याच्याकडे बघून हसत, ‘साप चावल्यानंतर असं हसणं खूप अवघड असतं,’ अशी प्रतिक्रिया दिली.

पुढे, फोटोग्राफर्सनी मिळून त्याच्यासाठी ‘बार बार दिन ये आये’ हे गाणेही गायले. हे ऐकून सलमान हसला. यावेळी त्याचा बॉडीगार्ड शेराही सलमान खानच्या मागे आहे. हा व्हिडिओ त्याच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, शनिवारी रात्री अभिनेता सलमान खानला सापाने दंश केला होता. सलमान खान त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर उपस्थित होता. ख्रिसमस साजरा करण्यासाठी तो फार्महाऊसवर आला असताना त्याच्यासोबत हा अपघात झाला. यानंतर रात्री उशिरा सलमान खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आला.

“सलमानला दंश करणाऱ्या सापाला पकडलं अन्…, वडील सलीम खान यांनी दिले संपूर्ण घटनेवर स्पष्टीकरण

दरम्यान, शनिवारी रात्री अभिनेता सलमान खानला पनवेलमधील वाजेपूर या गावातील फार्महाऊसमध्ये सर्पदंश झाला. मात्र हा साप विशारी नसल्याने सलमान खान बचावला. या घटनेनंतर सलमानच्या मित्र परिवारांनी व एका डॉक्टरांच्या पथकाने त्याला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात रात्रीच दाखल केले. एमजीएम रुग्णालयातील बाह्य रुग्ण सेवा विभागात त्याच्यावर सकाळी नऊ वाजेपर्यंत प्राथमिक उपचार करुन तो सूखरुप असल्याची खात्री झाल्यावर त्याला घरी सोडण्यात आले.

वाढदिवस असल्याने सलमानच्या पनवेलच्या शेतघरावर त्याचा मित्र परिवार आणि त्याचे कुटूंबिय एकत्र येऊन मोठा सोहळा साजरा करतात. शनिवारी रात्री ख्रिसमसची पार्टी पूर्ण झाल्यावर तो व त्याचे काही मित्र गप्पा मारत शेतघराच्या परिसरात बसल्यावर त्याच्या हाताला काही लागल्याचा भास झाला. याच दरम्यान सलमानची नजर परिसरात गेल्यावर त्याने साप जात असल्याचे पाहीले. सलमानला साप चावल्याचे समजताच अर्पिता फार्महाऊसवरील अनेकांची झोप उडाली. खासगी डॉक्टरांचे पथकाने पाहणी केल्यावर त्याच्या जिवाला धोका होऊ नये यासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. एमजीएम रुग्णालयातील बाह्य रुग्ण सेवा (कँज्युल्टी) विभागातील डॉक्टर आणि खासगी डॉक्टरांनी प्राथमिक पाहणी व रक्ताचे काही नमुणे घेतल्यावर सलमानची प्रकृती ठिक असल्याची खात्री पटल्यावर तेथून सकाळी घरी जाण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वीही पनवेलमधील सलमानचे अर्पिता फार्महाऊस आणि येथील सलमान व त्यांच्या कुटूंबियांचे अनेक किस्से पनवेलकरांच्या अनुभवात आहेत. सलमानच्या वाढदिवस साजरा करण्याच्या रात्री हवेत गोळीबारीचे प्रकरण, वाढदिवसाची राज ठाकरे यांनी त्याचा घेतलेली सदिच्छा भेट, विविध अभिनेता व  अभिनेत्र्यांनी वाढदिवसाच्या पार्टीत केलेला जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी, सलमान किंवा त्याचे भावांचे हवेत रिमोर्टवर चालणारे स्वयंचलित विमान फिरवणे, सलमानची सायकलस्वारी, सलमानची घोडस्वारी, आदिवासी वाड्यांवरील घरांचे केलेले रंगकाम, आदिवासींना आधुनिक व महागडे घरगुती भेटवस्तू देणे अशा विविध प्रसंगामुळे पनवेलचे सलमान खानचे फार्महाऊस चर्चेत आले आहे.

या घटनेनंतर एमजीएम रुग्णालयाची एक आधुनिक सेवा सुविधा असलेली वैद्यकीय रुग्णवाहिका त्यामध्ये डॉक्टरांचे पथक काही तासांसाठी सलमानच्या प्रकृतीसाठी अर्पिता फार्महाऊच्या परिसरात रविवारी तैनात ठेवण्यात आले होते. या घटनेनंतर सलमाननेही त्यांच्या फार्महाऊवरील कामगारांना काम करताना जरा सांभाळून काम करण्याचा सल्ला दिला. वाजेपूर गावामधील अर्पिता फार्महाऊस हे शेवटचे घर अनेक वर्षांपूर्वी सलमानचे वडील सलीम खान यांनी बांधले आहे. या घराच्या परिसरात पर्यावरण दृष्टया संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. तसेच माथेरान डोंगररांगा व कर्नाळा पक्षी अभयारण्यालगत हा परिसर असल्याने येथे वन्यजीवांचा वावर असतो.