ऐश्वर्या राय बच्चन आपल्या संसारामध्ये चांगलीच रमली आहे. पण काही वर्षांपूर्वी सलमान खानशी तिचं असलेलं नातं आजही अनेकांच्या लक्षात आहे. सलमान तर ऐश्वर्याच्या प्रेमामध्ये आकंठ बुडाला होता. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढली. ऐश्वर्या-सलमान यांना बऱ्याचदा एकत्रही पाहिलं गेलं. यांच्या अफेअरची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. पण सलमानने केलेल्या एका कृत्याची बरीच चर्चा रंगली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : मराठमोळ्या व्यक्तीच्या घरी जावून करिश्मा-करीनाने झुणका भाकरीवर मारला ताव, व्हिडीओ व्हायरल

सलमानच्या वागणूकीमुळे ऐश्वर्या आणि त्याचं नातं बिनसलं असं बोललं जातं. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमानने एकदा सगळ्याच मर्यादा पार केल्या. एका रात्री दारूच्या नशेमध्ये तो ऐश्वर्याच्या घराबाहेर पोहोचला. जेव्हा मध्यरात्री सलमान तिच्या घरी गेला तेव्हा त्याने घराचं दार जोर जोरात ठोठावलं. पण यादरम्यान ऐश्वर्याने त्याला कोणतंच उत्तर दिलं नाही आणि घराचं दारही उघडलं नाही.

सलमानने यावेळी रागामध्ये ऐश्वर्याच्या घराबाहेर बराच गोंधळ घातला होता. जवळपास २ ते ३ तास दारूच्या नशेमध्येच तो तिच्या घराबाहेर उभा राहिला. तेव्हा ऐश्वर्याच्या शेजारच्या मंडळींनी हे सारं चित्र आणि सलमानची अवस्था पाहिली. या घटनेनंतर ऐश्वर्या-सलमानचं नातं अधिक चर्चेत आलं.

आणखी वाचा – लग्नानंतरही सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर सनी देओलचं सुरु होतं अफेअर, पत्नीला सत्य समजलं अन्…

सलमानच्या याच वागणूकीमुळे दोघांच्या नात्यामध्ये अधिक दुरावा निर्माण होत गेला. काही दिवसांमध्येच ऐश्वर्या-सलमानच्या नात्याचा दी एण्ड झाला. या दोघांच्या ब्रेकअपमागे सलमान जबाबदार असल्याचंही त्यावेळी बोललं गेलं. आता दोघंही आपापल्या आयुष्यामध्ये सुखी आहेत. पण आजही ऐश्वर्या-सलमान एकमेकांच्या समोर आले तरी बोलणं टाळतात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan aishwarya rai bachchan relationship when actor was possessive about his girlfriend see details kmd