नुकतंच शाहरुख खानच्या ‘मन्नत’वर बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. सैफ अली खान, सलमान खान आणि अक्षय कुमार यांसारख्या कलाकारांची ‘मन्नत’वरील उपस्थिती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. अचानक अशाप्रकारे हे मोठे स्टार कलाकार शाहरुखच्या घरी जाण्याचं कारण काय याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत. या मागचं खरं कारण आता समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सौदी अरबच्या रेड सी फिल्म फेस्टिवलचे चेअरमन मोहम्मद अल टर्की आणि त्यांच्यासोबत काही पाहुण्यांनी नुकतीच भारताला भेट दिली आणि त्यांचं स्वागत शाहरुख खाननं मन्नतवर केलं होतं. यासाठी सलमान खान, अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांनी शाहरुखच्या घरी हजेरी लावली होती.

आणखी वाचा- “कोणत्याही राजकीय पक्षात…” मनसे मेळाव्यानंतर प्राजक्ता माळीची फेसबुक पोस्ट चर्चेत

सोशल मीडियावर संस्कृतिक मंत्री आणि अल- उलास शाही आयोगाचे गव्हर्नर बदर बिन फरहान अलसौद यांनी काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ते शाहरुख खान, सैफ अली खान, सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं, ‘बॉलिवूड सुपरस्टार्स सैफ, शाहरुख, अक्षय आणि सलमान खान यांची भेट. चित्रपटसृष्टीबद्दल बोलण्याची आणि संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळाली.’

आणखी वाचा- रणबीर कपूर- आलिया भट्ट ‘या’ दिवशी घेणार सप्तपदी, लग्नाचं ठिकाणही ठरलं!

दरम्यान शाहरुख खाननं अलिकडेच ‘पठाण’ चित्रपटाचं स्पेनमधील शूटिंग पूर्ण केलं असून तो भारतात परतला आहे. स्पेन शूटिंगनंतर तो दुबईमधील एका मॉलमध्ये दिसला होता. शाहरुख खानसोबत स्पेन शेड्युलसाठी दीपिका पदुकोणही होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून या चित्रपटात जॉन अब्राहम देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan akshay kumar and saif ali khan reached shahrukh khan home mannat know the reason mrj