इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी म्हणजेच आयफा (IIFA) पुरस्कार सोहळ्याची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. हा सोहळा गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या देशांमध्ये आयोजित करण्यात येतो. यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा अबू धाबी येथे दिमाखात पार पडला. यंदा या सोहळ्याचं २२वं वर्ष होतं. यावेळी या सोहळ्यात अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. पण सगळ्यांचे लक्ष हे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायने वेधले आहे.
आणखी वाचा : “जेव्हा माझे करिअर खडतर टप्प्यातून जात होते…”, सलमानने सांगितला बोनी कपूरसोबतचा ‘तो’ किस्सा
सध्या या (IIFA) सोहळ्यातील एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत सलमान आणि अभिषेक जवळ बसल्याचे दिसत आहे. त्या दोघांच्यामध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या संस्कृती, युवा आणि सामाजिक विकास मंत्रालयाचे शेख नह्यैन बिन मुबारक अल नह्यैन बसले आहेत.
आणखी वाचा : ‘दुख भरा प्रेम गीत’ ऑप्शन देत अमृता फडणवीसांचं पॉझिटिव्ह ट्विट; नेटकऱ्यांनाही आवाहन
आणखी वाचा : मुकेश अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या Arangetram सोहळ्यात, सलमान- आमिरसोबत ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी
आणखी वाचा : IMDb नुसार हे आहेत भारतातील टॉप ८ कॉमेडी चित्रपट, तुम्ही यापैकी कोणते पाहिलेत?
सलमान आणि अभिषेक यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी एका व्यक्तीने दोन अभिनेत्यांना वेगळं केल्याच्या मजेशीर कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘शेखला काढून त्या दोघांच्यामध्ये ऐश्वर्याचा फोटो लावा.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तिथे ऐश्वर्याची जागा असायला हवी होती.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘अभिषेक आणि सलमान एका फ्रेममध्ये…’ आणखी नेटकरी म्हणाला, ‘ऐश्वर्या कुठे आहे?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘त्या दोघांना एकत्र पाहून आनंद झाला.’