सलमान खान आणि कतरिना कैफ दोघंही मोरक्कोमध्ये ‘टायगर जिंदा है’ सिनेमाचे चित्रीकरण संपवून मुंबईत परतले आहेत. दोघांनी सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान फार मस्तीही केली. या सिनेमात सलमान आणि कतरिना अफलातून स्टंट करताना दिसणार आहेत. या स्टंटमध्ये ते पाण्याखाली खलनायकाशी दोन हात करताना दिसणार आहेत. त्यांच्या या स्टंटमुळे सिनेमाची लांबीही खूप वाढल्याचे कळते. नुकतेच या सिनेमाचे चित्रीकरण संपले. सिनेमाच्या संपूर्ण टीमने एक छोटेखानी पार्टीही केली. या फोटोमध्ये भाईजानने काळ्या रंगाचे टीशर्ट, मोनोक्रोमचा स्कार्फ आणि जीन्स घातली होती. तर कतरिनाने सफेद रंगाचे टीशर्ट आणि जीन्स घातली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाणी कपूरचं हॉट फोटोशूट पाहिलेत का?

सलमान आणि कतरिना ही हीट जोडी पाच वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ या सिनेमात ते शेवटचे एकत्र दिसले होते. २६ जुलैला कतरिनाने सलमानसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ते दोघं एकमेकांत गुंतून गप्पा मारतायेत असं वाटत होतं आणि यानंतर कतरिनाच्या काही बोलण्यावर सलमान लाजला. नेमकं कतरिना असं काय बोलली असेल ज्याने सलमान एवढा लाजला, हे जाणून घेण्याची आता त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

फिल्मफेअर मासिकाला दिलेल्या मुलाखतीत कतरिनाने सलमानचे तिच्या आयुष्यातले स्थान किती मोठं आहे ते स्पष्टपणे सांगितले. या मुलाखतीत ती म्हणाली की, ‘आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की सलमान कितीजणांना मदत करत असतो. पण माझ्यासाठी तो माझी सर्वात मोठी ताकद आहे. तो माझ्यासाठी काही खास करत नाही. पण तरीही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि अथक मेहनत घेण्यासाठी तो सतत माझ्या पाठीशी उभा असतो.’