बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि धकधक गर्ल माधुरी दीक्षितची जोडी प्रेक्षतांच्या पसंतीस उतरली आहे. त्यांच्या या जोडीने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आजच्या दिवशी म्हणजे २२ ऑक्टोबर १९९३ साली ‘दिल तेरा आशिक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमान आणि माधुरी मुख्य भूमिकेत होते.
लॉरेन्स डिसूझा दिग्दर्शित या चित्रपटात सलमान, माधुरी आणि अनुपम खेर, कादर खान, असरानी आणि शक्ती कपूरसारखे दिग्गज कलाकार होते. या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याच्या प्रमोशनवेळी एक मजेशीर घटना घडली होती. या प्रमोशनच्या ठिकाणी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. ‘दिल तेरा आशिक’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याच्या प्रमोशनसाठी सलमान आणि माधुरीसोबत गायिका अल्का याग्निक आणि अभिनेते धर्मेंद्र देखील उपस्थित होते.
आणखी वाचा : जात लपवण्यासाठीच वडिलांनी स्वीकारलं ‘बच्चन’आडनाव, अमिताभ यांचा खुलासा
आणखी वाचा : ‘या’ कारणामुळे शाहरुख आजही विसरला नाही चंकी पांडेचे ‘ते’ उपकार
घडले असे की, धर्मेंद्र जी तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांशी बोलत होते. माधुरीची स्तुती करत असताना ते म्हणाले, “ही आहे आमची वर्ल्ड क्लास माधुरी दीक्षित” आणि सलमान विषयी म्हणाले, “त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुलेमान.” धर्मेंद्र यांच हे वाक्य ऐकल्यानंतर उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक हसू लागले. अचानक त्यांना त्यांची चुक कळली आणि त्यांनी लगेच सलमानची माफी मागितली. सलमानने पुढे येऊन धर्मेंद्र यांना मिठी मारली आणि माफी मागू नका असं म्हणाला. अल्का याज्ञिकसोबत कुमार सानूंनी हे गाणं गायलं आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज २८ वर्षे पूर्ण झाली आहे.