बॉलिवूड सेलिब्रेटींमध्ये अनेकदा भांडणं आणि अफेअर्स पाहायला मिळातात आणि चाहत्यांनाही आपल्या आवडत्या कलाकराच्या आयुष्यात काय घडून गेलंय किंवा काय चालू आहे हे जाणून घ्यायला आवडतं. कलाकारांची भांडणं असो वा अर्धवट राहिलेली प्रेम काहणी हे केवळ त्यांच्या चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही खूप चर्चेत राहिलं आहे. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी यापैकीच एक आहे. ज्यांच्या अफेअरचीच नाही तर भांडणाचीही जोरदार चर्चा झाली. पुढे ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं तर सलमान आजही अविवाहित आहे. पण त्याआधी ऐश्वर्याला सलमान खानच्या रागीट स्वभावामुळे खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. एवढंच नाही तर या दोघांच्या भांडणात राणी मुखर्जी आणि शाहरुख खान यांनाही हस्तक्षेप करावा लागला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटाच्या सेटवर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. जेव्हा या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर आली तेव्हा या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. सलमान- ऐश्वर्याची मैत्री प्रेमात बदलली, जवळीक वाढली, इतरांप्रमाणे यांच्यातही वाद झाले पण अखेर एक वेळ अशी आली की रोजच्या वादांना कंटाळून ऐश्वर्याने सलमानपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आजही या दोघांच्या ब्रेकअपबद्दल वेगवेगळ्या चर्चा होताना दिसतात.
आणखी वाचा- शिल्पा शेट्टीचा मुलगा वयाच्या १० व्या वर्षीच झाला बिझनेसमन, करतोय अनोखा व्यवसाय

सलमान खान ऐश्वर्याच्या बाबतीत खूपच पजेसिव्ह होता. याच कारणामुळे या दोघांचं ब्रेकअप झालं असं बोललं जातं. सलमानचं विनाकारण प्रत्येक गोष्टीत बोलणं, व्यावसायिक आयुष्यात हस्तक्षेप करणं ऐश्वर्याला अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला होता आणि ऐश्वर्याने सलमानपासून दूर जायला सुरुवात केली होती. अर्थात हे सलमानला सहन झालं नाही. त्याला या सगळ्याचा भयंकर राग आला आणि यामुळे ऐश्वर्याला खूप मोठं नुकसान झालं होतं.

२००३ साली ऐश्वर्या राय अभिनेता शाहरुख खानसह ‘चलते चलते’ चित्रपटाचं शूटिंग करत होती. मीडिया रिपोर्टनुसार एके दिवशी शूटिंग सुरू असतानाच सलमान खान चित्रपटाच्या सेटवर पोहोचला आणि त्या ठिकाणी त्याने खूप मोठं भांडण केलं. एवढंच नाही तर त्याने सेटवरील सामानाचीही तोडफोड केल्याचं बोललं जातं. या सर्व गोष्टींमुळे प्रोडक्शन हाऊसला खूप मोठं नुकसान झालं आणि परिणामी त्यांनी चित्रपटातून ऐश्वर्याला काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा- “सलमान आणि शाहरुखने मला लहान भावाप्रमाणे…” शोएब अख्तरने केला होता खुलासा

सलमान खान आणि ऐश्वर्याचं नातं तुटण्याच्या मार्गावर होतं. दोघांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत होते. त्यांच्यातील भांडणामुळे फिल्ममेकर्सना नुकसान होत होतं. अशात या दोघांमधील संबंध सुधरावेत यासाठी शाहरुख खानने या दोघांच्या भांडणात हस्तक्षेप केला होता असं बोललं जातं. पण शाहरुखने सलमानला समजावण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आणि सलमान खान शाहरुखवरच भडकला. यामुळे सलमान- शाहरुखच्या मैत्रीत तर दुरावा आलाच पण यासोबतच ‘चलते चलते’मधून ऐश्वर्याला काढून टाकण्यात आलं आणि त्या जागी राणी मुखर्जीला कास्ट करण्यात आलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan anger make big loss of aishwarya rai bachchan and breakup reason mrj