गेल्या एक वर्षापासून सूरू असलेल्या करोना महामारीमुळे सिंगल स्क्रीन आणि मल्टीप्लेक्स बिजनेस अगदी कोलडून गेलाय. तसंच वाढते करोना रूग्ण संख्या पाहता चित्रपट व्यवसाय देखील रूळावर येतील, याची चिन्ह अगदी दूरदूरपर्यंत दिसून येत नाहीत. या करोना काळात सिनेमागृह मालकांचं झालेलं नुकसान भरून निघता यावं यासाठी बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानने त्याचा बहूचर्चित ‘राधे’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मसह थिएटरमध्ये देखील रिलीज करण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांना दिलेली कमिटमेंट पूर्ण करणाऱ्या सलमानने मात्र थिएटर मालकांना दिलेली कमिटमेंट पूर्ण केली नाही. यासाठी त्याने थिएटर मालकांची माफी मागितली आहे.
काही दिवसांपूर्वीच कमी झालेले करोना रूग्णांचे आकडे पुन्हा एकदा वाढताना दिसू लागले आहेत. अशा परिस्थितीत एककीडे बडे बडे स्टार्स चित्रपटाच्या तारखा पुढे ढकलताना दिसून आले. तर दुसरीकडे बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानने मोठी जोखीम उचलली आणि त्याचा बहूचर्चित ‘राधे’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मसोबतच थिएटरमध्ये देखील रिलीज करण्याचा निर्णय घेतला. करोना काळात थिएटरमध्ये चित्रपट रिलीज करण्याचा सलमानचा निर्णय ही मोठी रिस्क असल्याची कुजबूज बॉलिवूडमध्ये सुरू होती.
देशात जिथे लॉकडाउन सुरू आहे अशा शहरातले थिएटर वगळता मोजक्या चित्रपटगृहात ‘राधे’ चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. ईदच्याच दिवशी आपला चित्रपट रिलीज करण्याची चाहत्यांना दिलेली कमिटमेंट तर सलमान खानने पूर्ण केली. परंतू लॉकडाउनमुळे ज्या थिएटरमध्ये त्याचा चित्रपट रिलीज होऊ शकणार नाही, अशा थिएटर मालकांची त्याने माफी मागितली आहे. पत्रकारांशी झूमद्वारे बोलताना त्याने ही माफी मागितली.
View this post on Instagram
सर्व थिएटर मालकांची मी माफी मागतो
यावळी सलमान खान म्हणाला, “जे थिएटर मालक माझा चित्रपट रिलीज करून बिझनेस कमवण्याच्या आशेवर होते, अशा सर्व थिएटर मालकांची मी माफी मागतो. देशात सुरू असलेली ही महामारी लवकरात लवकर संपवून आम्ही देशभरातील सर्वच थिएटरमध्ये हा चित्रपट रिलीज व्हावा यासाठी बराच काळ वाट पाहिली. पण तसं होऊ शकलं नाही. माहित नाही आता हे सगळं कधी नीट होईल. ”
बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबतही त्याने काही गोष्टी शेअर केल्या. यावेळी तो म्हणाला, “राधे चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन शून्य होणार आहे. माझ्या कोणत्या ही चित्रपटासाठी हे कमीच असणार. भारत आणि इतर देशात सामान्य चित्रपटाच्या तुलनेत खूप कमी थिएटरमध्ये ही फिल्म रिलीज होतेय. यामूळे बॉक्स ऑफिस कलेक्शन खूपच कमी होणार आहे.”