अभिनेता सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे. त्याचे ‘किक’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’ असे बरेचसे चित्रपट सुपरहिट झाले आहेत. त्याच्या चित्रपटांनी कोटींच्या घरात कमाई केली आहे. चाहत्याचा लाडका भाईजान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या, ‘गॉडफादर’च्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय त्याचा बहुचर्चित ‘किसी का भाई.. किसी की जान’ हा चित्रपट काही महिन्यांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलमान खानचे चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत असले, तरी एक काळ होता जेव्हा त्याचे चित्रपट फ्लॉप झाले होते. त्याच्या ‘युवराज’, ‘गॉड तुसी ग्रेट हो’, ‘जान-ए-मन’, ‘लकी’ अशा सलग प्रदर्शित झालेल्या फ्लॉप चित्रपटांची रांग लागली होती. याच काळात त्याने या क्षेत्रापासून थोड्या वेळासाठी लांब राहण्याचे ठरवले होते. दरम्यान “वॉंटेड” या चित्रपटामुळे तो करिअरच्या या कठीण परिस्थितीमधून बाहेर पडला. हा चित्रपट १८ सप्टेंबर २००९ रोजी प्रदर्शित झाला होता. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल १३ वर्ष पूर्ण झाली आहेत.

‘वॉंटेड’ चित्रपट सलमान खानसाठी लकी ठरला. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर कमाई करायला सुरुवात केली. या चित्रपटाचे तेव्हा ६०-६५ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटामध्ये सलमानसह आयशा टाकियाने काम केले होते. तिच्या करिअरचा हा सर्वात हिट चित्रपट आहे. त्यावेळी सलमानचे चित्रपट चालत नव्हते आणि आयशा तशी नवखी अभिनेत्री होती; असे असतानाही चित्रपट करायचा निर्णय दिग्दर्शक प्रभूदेवा घेत तो हिट करुन दाखवला. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. या चित्रपटामध्ये प्रकाश राज, महेश मांजरेकर आणि विनोद खन्ना यांनी सहायक व्यक्तिरेखा साकारल्या होत्या.

आणखी वाचा – धनुषची दुहेरी भूमिका असणाऱ्या ‘या’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; दिग्दर्शनाची धुरा धनुषच्या भावाच्या खांद्यावर

हा चित्रपट पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पोकिरी’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.