बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरत असलेल्या ‘भारत’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या पोस्टरमध्ये सलमान खान एका ७० वर्षीय वयोवृद्धाच्या भूमिकेत दिसून आला. या पोस्टरनंतर चित्रपटाचं आणखी एक पोस्टर प्रदर्शित झालं असून या पोस्टरमधील सलमानचा लूक पाहण्यासारखा आहे.
‘भारत’चं दुसरं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून हे पोस्टर सलमानने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये १९६४ सालचा काळ दाखविण्यात आला असून सलमान त्या काळातील तारुण्यावस्थेत दिसून येत आहे. त्याचप्रमाणे या पोस्टरच्या बॅकग्राऊंडला सर्कसमधील मौत का कुऑ दिसून येत आहे.
“जवानी हमारी जानेमन थी. भारत की जवानी”, असं टॅगलाइन या पोस्टरवर लिहिली आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” दक्षिण कोरियन चित्रपटावर भारत आधारलेला आहे. ‘भारत’ चित्रपटात रशियन सर्कस आणि अन्य काही साहसी दृश्य पाहायला मिळणार आहेत. ‘भारत’मध्ये दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.