विविध कारणानं चर्चेत असलेल्या सलमानच्या ‘भारत’ चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालंय. आता सलमानच्या चाहत्यांना चित्रपटाच्या ट्रेलरचे वेध लागले आहेत. वर्षभरापासून ‘भारत’ची एक झलक पाहण्यासाठी आतुर असलेल्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. प्रेक्षकांची उत्सुकता फार न ताणता आता चित्रपटाच्या आणि ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.
एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे २४ एप्रिलला ‘भारत’चा पहिला ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. २६ एप्रिलला ‘अॅव्हेंजर एंडगेम’ चित्रपटाच्यादरम्यान प्रेक्षकांना सलमानच्या ‘भारत’चा ट्रेलर पाहता येणार आहे. ईदला ५ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कतरिना कैफ, दिशा पटानी आणि सलमान खान या तिघांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफारनं केलं आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” दक्षिण कोरियन चित्रपटावर ‘भारत’ आधारलेला आहे. ‘भारत’ चित्रपटात रशियन सर्कस आणि अन्य काही साहसी दृश्य पाहायला मिळणार आहेत. प्रियांका चोप्रानं काही दिवसांपूर्वीच ‘भारत’ला तडकाफडकी सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत होता. ‘भारत’मध्ये या कलाकारांबरोबच नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर यांसारखे कलाकारही पाहायला मिळणार आहेत.
And here's some #Xclusiv info on Salman Khan starrer #Bharat…
* #BharatTrailer will be launched on 24 April 2019.
* #BharatTrailer will be showcased with #AvengersEndgame on 26 April 2019.
* Release date locked: 5 June 2019. #Eid2019— taran adarsh (@taran_adarsh) March 25, 2019
दिल्ली, अमृतसर, पंजाब अशा विविध शहरात भारतचं चित्रीकरण पार पडलं. भारतव्यतिरिक्त सलमानचा ‘ईन्शाल्ला’ आणि ‘दबंग ३’ हे दोन चित्रपटदेखील २०१९ आणि २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहेत.