अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला जुलै २०२१ मध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली. तेव्हापासूनच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत. राज कुंद्रा सध्या तुरुंगाबाहेर असला तरी सोशल मीडियावर त्याला ट्रोल करणं नेटकऱ्यांनी थांबवलेलं नाही. शिल्पा-राजने नुकतंच थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला. जवळपास वर्षभरानंतर राज कुंद्रा सोशल मीडियावर देखील सक्रिय झाला आहे. आता त्याच्याबाबत एक नवी माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – Video : मध्यरात्री लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली शहनाज गिल, व्हिडीओ व्हायरल झाला अन्…

राज कुंद्रा गेल्या वर्षभरापासून प्रसारमाध्यमांपासून दूर आहे. इतकंच काय तर घराबाहेर पडताना तो फेस शिल्डचा वापर करतो. आता राज कुंद्रा चक्क छोट्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. हिंदी ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याच पर्वासाठी राज कुंद्राला विचारण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, राज कुंद्रा आणि हिंदी ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांमध्ये चर्चा सुरु आहे. राज कुंद्राने या शोमध्ये सहभागी व्हावं असा विचार शोचे निर्माते करत आहेत. आता खरंच हिंदी ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वामध्ये तो सहभागी होणार का? तसेच राज कुंद्रा यासाठी तयार होणार का? हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच.

आणखी वाचा – जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ मासिकाने घेतली ‘पल्याड’ची दखल; मराठी चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार

पॉर्नोग्राफिक व्हिडिओ तयार केल्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला जुलै २०२१ सालामध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली होती. राज कुंद्रासह चार आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल केले. कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले होते. सप्टेंबरमध्ये त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता.

Story img Loader