दरवर्षी ईदला एक हिट या हिशोबाने सलमान खानने लागोपाठ चार रेकॉर्डब्रेक कमाई करणारे चित्रपट दिले. ‘वाँटेड’, ‘दबंग’, ‘बॉडीगार्ड’ आणि ‘एक था टायगर’ असे क्रमाक्रमाने दरवर्षीच्या ईदला त्याचे चित्रपट झळकत गेले आणि सलमान तिकीटबारीवर नवीन रेकॉर्ड कायम करत गेला. अपवाद ठरली ती यावर्षीची ईद. सलमानचा एकही चित्रपट यावर्षी ईदला येणार नाही, हे कळताच शाहरूखने ही संधी घेतली. ईदच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या शाहरूखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने सलमानच्याच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. हे कळताच सलमानने पहिल्यांदा काय केले असेल तर पुढच्या वर्षीची ईद आपल्या चित्रपटासाठी निश्चित केल्याचे जाहीर क रून तो मोकळा झाला आहे. ‘दबंग २’ नंतर सलमान कोणत्या चित्रपटावर काम सुरू करणार हेच नक्की होत नव्हते. सोहैल खानचा ‘शेरखान’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाला तो सुरूवात करेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात, दोन वेगळ्याच चित्रपटांवर काम सुरू झाले. एक आहे तो त्यांच्याच होम प्रॉडक्शनचा ‘मेंटल’ आणि दुसरा साजिद नाडियादवालाचा ‘किक’. मात्र, कुठला चित्रपट करायचा या वादावादीत त्याच्या हातातून या ईदला चित्रपट प्रदर्शित करायची संधी गेली. आता किकच्या चित्रिकरणाला सुरूवात झाली आहे. सलमानवर सुरू असलेल्या ‘हिट अॅंड रन’ प्रकरणामुळे ‘किक’च्या चित्रिकरणाचे शेडय़ूल लांबत चालले होते. आता सगळ्या गोष्टी निश्चित झाल्या. घरच्यांबरोबर ईद साजरी करून आणि शाहरूखच्या चेन्नई एक्स्प्रेसच्या यशाचे आकडे ऐकत ऐकत ग्लासगोला पोहोचलेल्या सलमानने ‘किक’च्या पूर्वप्रसिध्दीची तयारी सुरू केली आहे.
आता ‘किक’चे दिग्दर्शनही साजिद नाडियादवालाच करणार असल्याचेही सलमानने जाहीर केले आहे. निर्माता म्हणून साजिदने अनेक हिट चित्रपट दिले असले तरी दिग्दर्शक म्हणून हा त्याचा पहिलाच चित्रपट असणार आहे. आणि यावर्षीचा कारकिर्दीतला उतार भरून काढायचा तर ‘किक’ हिट होणे ही सलमानची मोठी गरज ठरणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी ईदला आपलाच चित्रपट येणार याची खबरदारी सल्लूने पहिल्यांदा घेतली आहे.
पुढच्या वर्षीची ईद सलमानच्या ‘किक’साठी
दरवर्षी ईदला एक हिट या हिशोबाने सलमान खानने लागोपाठ चार रेकॉर्डब्रेक कमाई करणारे चित्रपट दिले. ‘वाँटेड’, ‘दबंग’, ‘बॉडीगार्ड’ आणि ‘एक था टायगर’ असे क्रमाक्रमाने दरवर्षीच्या ईदला त्याचे
First published on: 15-08-2013 at 06:39 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodसलमान खानSalman Khanहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan blocks next years eid slot for kick