गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वातून अनेक धक्कादायक बातम्या येत आहे. बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा बॉडी डबल असलेल्या सागर पांडेचं निधन झालं आहे. सागर जिममध्ये वर्कआऊट करत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तो ५० वर्षांचा होता. या बातमीमुळे अनेकांना धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर पांडे हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असायचा. तो प्रचंड लोकप्रिय होता. त्याचे अनेक चाहते होते. तो सलमान खानची कार्बन कॉपी म्हणून ओळखला जायचा. सागर हा जिममध्ये वर्कआऊट करताना त्याच्या छातीत अचानक वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना जोगेश्वरीमधील बाळासाहेब ट्रॉमा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आणखी वाचा : “मी तुमच्या मुलावर….” सासूबाईंच्या निधनानंतर नम्रता शिरोडकरची भावूक पोस्ट
यानंतर बॉलिवूडसह अनेक कलाकारांनी त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. अनेकांना हे वृत्त ऐकून धक्का बसला. भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबेने याबद्दल पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले.
आणखी वाचा : दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांच्या आईचे निधन
सागर पांडे हा उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. तो सलमान खानप्रमाणे अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आला होता. अनेक वर्षे संघर्ष करुनही त्याला सिनेसृष्टीत काम मिळाले नाही. त्यानंतर त्याने बॉडी डबल म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तो सलमान खानचा फार मोठा चाहता होता. विशेष म्हणजे त्याच्याप्रमाणे तो बॅचलर होता.
सागरने १९९८ मध्ये ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातून बॉडी डबल म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्याने दबंग, दबंग २, बजरंगी भाईजान आणि ट्यूबलाइट यासारख्या जवळपास ५० चित्रपटात बॉडी डबल म्हणून काम केले आहे. लॉकडाऊनमध्ये काम न मिळाल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता, असे त्याने गेल्यावर्षी सांगितले.