बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान दरवर्षी त्याच्या गॅलक्सी अपार्टमेन्टमध्ये गणरायाची प्रतिष्ठापणा करतो. पण, त्याच्या घराचे नूतनीकरण चालू असल्यामुळे यंदा सलमान कुटुंबियासमवेत बहिण अलवीराच्या घरी गणेशोत्सव साजरा करत आहे. काही दिवसांपूर्वी अर्पिताने (सलमानची बहिण) गणपतीची आतुरतेने वाट पाहत असल्याचे ट्विट केले होते.सलमान त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर गणेशाचे आगमन करणार होता. मात्र, घराच्या नूतनीकरणाच्या कामामुळे त्याने बहिणीच्या घरी गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले. सलमानचे संपूर्ण कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमंडळी गणपतीच्या दर्शनासाठी अलविराच्या घरी गेले होते.
सलमानचा बाप्पा बहिणीच्या घरी!
बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान दरवर्षी त्याच्या गॅलक्सी अपार्टमेन्टमध्ये गणरायाची प्रतिष्ठापणा करतो.

First published on: 10-09-2013 at 01:08 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan celebrates ganesh chaturthi with family at sister alviras home