Salman Khan Rash Driving Past Incident : २००२ साली हिट अॅन्ड रन प्रकरणात अडकलेला सलमान खान पूर्वीपासूनच साहसी होता, असं त्याचा मित्र आणि सहकलाकार आसिफ शेखने एका मुलाखतीत सांगितलं. सलमान खानचे असे साहसी उद्योग सातत्याने समोर येत असतात. यामुळे कधीकधी तो चाहत्यांची वाहवाह मिळवतो तर कधी कायदेशीर कारवाईला सामोरे जातो. आसिफ खानने असाच एक किस्सा एका मुलाखतीत शेअर केला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

द लल्लनाटॉपच्या मुलाखतीत आसिफने १९९८ च्या बंधन चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा सांगितला. तो म्हणाला की, “सलमान खान पूर्वीपासूनच रिस्क घेणाऱ्यातला होता. त्यावेळी सलमानकडे एस्टीम गाडी होती. एकदा त्याने शूटींगहून घरी परतताना मला लिफ्ट दिली. त्यावेळी तो फूटपाथवर, रस्त्यावर गाडी चालवू लागला. त्यामुळे मी त्याला घाबरून म्हणालो की सलमान खान आपण पकडले जाऊ. तर तो म्हणाला, पकडले गेलो तरी मी सलमान खान आहे, घाबरू नको.”

Suraj Chavan Gautami Patil Video
‘झापूक झुपूक’ सूरज चव्हाण अन् गौतमी पाटीलची भेट, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “भावाने मार्केट जाम केलंय”
marathi actress pranit hatte reaction on bigg boss marathi season 5 fame ghanshyam darode viral video
“बिग बॉस मराठीला तू कलंक होतास”, घनःश्याम दरवडेचा…
Radhika Merchant offers birthday cake to brother-in-law Akash Ambani but he is refused video viral
Video: लग्नानंतरचा राधिका मर्चंटचा पहिला वाढदिवस! अँटिलियामध्ये झालं जंगी सेलिब्रेशन, मात्र आकाश अंबानीने केक खाण्यास दिला नकार
nikki tamboli on suraj chavan won bigg boss sympathy card
सूरज चव्हाण सहानुभूतीमुळे बिग बॉस जिंकला, या टीकेवर निक्की तांबोळी म्हणाली, “मी ट्रॉफी उचलली असती तर…”
salman khan life threat lawrence bishnoi gang
“जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर…”, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने आली धमकी; केली ‘ही’ मागणी!
hansika motwani new home gruh pravesh
बॉलीवूड अभिनेत्रीने खरेदी केलं आलिशान घर, पतीबरोबर केला गृहप्रवेश, पाहा घराची झलक
Tamannaah Bhatia Questioned By ED
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाच्या अडचणींमध्ये वाढ, महादेव बेटिंग APP प्रकरणात ईडीकडून चौकशी
shiv thakare celebrate grandmother birthday
Video : आजी अन् नातवाचं प्रेम! ‘बर्थडे गर्ल’ म्हणत शिवने ‘असा’ साजरा केला लाडक्या आजीचा वाढदिवस, सर्वत्र होतंय कौतुक
dilip kumar secretly married with asma rehman after 16 years of marriage
१६ वर्षांच्या संसारानंतर दिलीप कुमार यांनी गुपचूप केलेलं दुसरं लग्न; सायरा बानो यांना बसलेला मोठा धक्का, नेमकं काय घडलेलं? वाचा

हेही वाचा >> “जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर…”, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने आली धमकी; केली ‘ही’ मागणी!

पोलिसांनी अडवलं पण ओळखलंच नाही

“तेवढ्यातच एका ट्रॅफिक पोलिसाने आम्हाला पकडले. त्यांनी गाडीच्या काचा खाली केल्या. पण ट्राफिक पोलिसांनी सलमानला ओळखलेच नाही. मी म्हणालो की, “अरे याने ओळखलंच नाही. आता शर्ट काढून दाखव म्हणजे पोलीस ओळखतील.”

आसिफच्या मित्रालाही सलमानने घाबरवलं होतं

पुढे त्याने हैदराबाद येथे शूट झालेल्या औझर या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, माझा मित्र त्याची नवीन कार दाखवण्याकरता सेटवर आला होता. तेवढ्यात सलमान खान सेटवर आला. माझ्या मित्राला घाबरवण्याकरता त्याने त्याची कार बेदरकारपणे चालवली. त्यामुळे माझा मित्र घाबरला. पण सलमान खान नंतर यावर प्रचंड हसला, कारण तो त्याची फक्त मस्करी करत होता.

दरम्यान, २००२ साली झालेल्या हिट अॅन्ड रन प्रकरणी सलमान खानला २०१५ मध्ये क्लीन चिट मिळाली. सलमानविरोधात सबळ पुरावे न मिळाल्याने त्याच्यावरील गुन्हा मागे घेण्यात आला होता. तर, गेल्या काही दिवसांपासून सलमान खान पुन्हा चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या घराजवळ लॉरेन्स बिश्नोई गँगने गोळीबार केला होता. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळेही सलमान खान चर्चेत आला आहे. बाबा सिद्दीकी यांचे सलमान खानबरोबर चांगले संबंध होते, त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला केल्याचं समोर येतंय. तसंच, गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत.