बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आपला ‘दबंग ३’ हा आगामी चित्रपट घेऊन लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. तेव्हापासूनच चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमानची लोकप्रियता पाहाता ‘दबंग ३’ हा २०१९ मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरेल असे म्हटले जात आहे. कारण प्रदर्शनापूर्वीच ‘दबंग’ने आपली कमाई सुरु केली आहे. अॅमेझॉन प्राईमला ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि टी सीरिजला चित्रपटातील संगीताचे हक्क विकून ‘दबंग’ने तब्बल १५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Viral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका

घडल असं की, ‘सनी’नं मागितली ‘सनी’ची माफी

सलमान खान स्वत:च या चित्रपटाचा निर्माता आहे. त्याने आपला भाऊ अरबाज खानच्या मदतीने ‘दबंग ३’ची निर्मिती केली आहे. त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचे हक्क अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओला ६० कोटी रुपयांचा विकले. त्याचवेळी त्यांनी ८० कोटी रुपयांना चित्रपटाचे सेटेलाईट हक्क झी नेटवर्कला विकले. शिवाय टी सीरिजने चित्रपटाचे संगीत हक्क १५ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहेत. परिणामी प्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ने तब्बल १५५ कोटी रुपये मिळवले आहेत.

‘दबंग ३’ हा दबंग मालिकेतला अनुक्रमे तीसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. तसेच या चित्रपटांमध्ये सोनाक्षी सिन्हा हीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. ‘दबंग ३’ मध्ये सोनाक्षीच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शिवाय मराठी सुपरस्टार महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही देखील या चित्रपटामध्ये अभिनय करताना दिसेल.

‘दबंग’ चित्रपट मालिकेत सलमानने चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट फ्लॅशबॅक फॉरमॅटमध्ये तयार केला गेला आहे. यांत पोलिस अधिकारी होण्याच्या आधी चुलबुल कसा होता? हे कथानक दाखवले जाणार आहे. सलमानचा चाहता वर्ग पाहता याआधी प्रदर्शित झालेल्या ‘ट्यूबलाईट’, ‘रेस -३’ व ‘भारत’ या तीनही चित्रपटांनी तिकीट बारीवर काही खास कमाल केली नव्हती. या पार्श्वभूमीवर ‘दबंग -३’ काय कमाल करतो हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल असे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan dabangg 3 earns 155 crores before the release mppg