काही वर्षांपूर्वी आलेला सलमानचा ‘दबंग’ चांगलाच गाजला. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वलही आला. या चित्रपटाचा नायक ‘चुलबूल पांडे’ आणि त्याची स्टाईल, त्याचा दरारा, गावगुंडाना धाकात ठेवण्याची त्याची पद्धत हे सारं प्रेक्षकांना खूपच भावलं. ‘दबंग’ सिक्वल येऊन सात वर्षांहून अधिक काळ उलटला तेव्हापासून ‘दबंग ३’ येणार अशा चर्चा होत्या. आता जवळपास सात वर्षांनंतर हा चित्रपट येणार असल्याची माहिती सलमानचा भाऊ अरबाझ खान यानं दिली आहे.

एप्रिल महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असून चित्रीकरणासाठी योग्य स्थळाच्या शोधात ‘दबंग’ची टीम आहे. प्रभू देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. ‘दंबग ३’ हा प्रिक्वल असून यात चुलबूल पांडेची कौटुंबिक पार्श्वभूमी दाखवण्यात येईल अशी चर्चा आहे तर दुसरीकडे हा चित्रपट नोएडामधल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित असल्याचंही म्हटलं जात आहे.  मात्र सलमाननं याबद्दल बोलण्यास नकार दिला आहे. या चित्रपटाची कथा सध्या गुलदस्त्यातच राहू दे असं सलमाननं म्हटलं आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader