बॉलिवूड अभिनेता सलमान खान व त्याची रेंज रोव्हर कार सर्व परिचीत आहेत. मात्र, मंगळवारी रात्री सलमानच्या रेंज रोव्हरने त्याला रस्त्यातच धोका दिला. सलमान घरी जात असताना त्याची कार रस्त्यातच बंद पडली. ‘दबंग’ स्टारला मग रिक्षा पकडून घरी जाण्याशिवय पर्याय शिल्लक राहिला नाही. सलमानने चक्क रिक्षा पकडून घर गाठले. मात्र, रिक्षा प्रवासाचा अनुभव त्याला आनंद देणारा ठरला असल्याचे सलमान म्हणतो.
टिवटरवर सलमानने रिक्षा प्रवासाचा अनुभव पोस्ट केला:

 

रेंज रोव्हरच्या ग्राहक सेवेवर सलमानने टीका केली असून, त्याला कंपनीकडून चांगली सेवा मिळत नसल्याचा टिवट सलमानने केला:

 

 

सलमाची रेंज रोव्हर खूप वाईट स्थितीमध्ये असल्याचे व नऊ वेळा रेंज रोव्हरचे ब्रेक फेल झाल्याचा त्याचा पुढील टिवट म्हणतो:

नुकतेच सलमानने त्याच्या ‘बिग बॉस’ची स्पर्धक शिल्पा साकलानीच्या डोळ्यांची तूलना त्याची भूतपूर्व प्रेयसी ऐश्वर्या राय बच्चनच्या डोळ्यांशी करून नवा वाद सुरू केला आहे. शिल्पाच्या डोळ्यांची स्तुती करत सलमानने तीचा पती अपूर्व अग्निहोत्रीची खोड काढली असल्याचे म्हणले जात आहे.