बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान सध्या ‘प्रेम रतन धन पायो’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाचे उदयपूरमध्ये चित्रीकरण सुरु असून, सलमानची बहिण अर्पिता आणि तिचा पती आयुषने चित्रीकरणस्थळी जाऊन सलमानची भेट घेतली. त्यानंतर तिघांनी राजेराजवाड्यांच्या या शहरात बोटीने प्रवास करण्याचा आनंद लुटला. बोट प्रवासादरम्यानची छायाचित्रे अर्पिता खान शर्माने सोशल मीडियावर शेअर केली आहेत. अर्पिताने शेअर केलेल्या या छायाचित्रांमध्ये सलमान खान बोटीच्या प्रवासाची मजा लूटताना, निसर्ग सौंदर्य कॅमेऱ्यात टिपताना आणि माकडांच्या फौजेला खाऊ घालताना दिसतो.

salman-khan-boat-embed

salmankhan-ayeush-embed

salman-monkeys-embed

Story img Loader