बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. मात्र, बऱ्याच अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतरही सलमान अजूनही अविवाहित आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली आणि सलमान खान एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. सलमान खान आणि सोमी आठ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी दोघांच्या अफेअरच्या मोठ्या चर्चा होत्या. मात्र आठ वर्षांनंतर ब्रेकअप झाल्यानंतर सोमीने बॉलिवूडचा निरोप घेत परदेशात स्थायिक झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमी अली ही सलमान खानचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट पाहून त्याच्या प्रेमात वेडी झाली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर सलमानसोबत लग्न करण्याचे स्वप्न घेऊन ती भारतात आली. विशेष म्हणजे ते दोघेही एकमेकांना १९९१ ते १९९९ पर्यंत डेट करत होते. नुकतच सोमी अलीने फ्री प्रेस जर्नल या वेबसाईटला एक मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या मुलाखतीदरम्यान तिने सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये असताना घडलेला एक किस्सा सांगितला आहे.

या मुलाखतीदरम्यान सोमी म्हणाली, “आम्ही हिंदी चित्रपट पाहायचो आणि माझा सलमानवर खूप क्रश होता. त्या रात्री मला एक स्वप्न पडले. यानंतर मी भारतात जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी फक्त १६ वर्षांची होते आणि मी मुंबईला जाऊन तिथे लग्न करू शकते असा विचार करणेही त्यावेळी विचित्र होते. पण मी लग्नाचे स्वप्न पाहू लागले. त्यावेळी मला वाटलं की सर्व देवाचीच इच्छा आहे. त्यानंतर मी माझी सुटकेस शोधू लागले. मी माझ्या आईला सांगितले की मी सलमान खानशी लग्न करण्यासाठी मुंबईला जात आहे.”

यानंतर सोमीने सलमानसोबत एका चित्रपटाचे शूटींगही केले. मात्र काही कारणात्सव ते बंद पडले. त्याबद्दल बोलताना सोमी म्हणाली, “आम्ही नेपाळला जात होतो. त्यावेळी मी त्याच्या समोर बसली होती. मी त्याचा एक सुंदर फोटो काढला आणि त्याला तो दाखवला.” त्यानंतर मी त्याला म्हणाली, “तुझ्याशी लग्न करायला मी इथपर्यंत आली आहे.”

त्यावर तो म्हणाला, ‘माझी गर्लफ्रेंड आहे.’ त्यावर मी म्हणाली, ‘मला काही फरक पडत नाही.’ “त्यावेळी मी किशोरवयीन होते. एका वर्षानंतर मी जेव्हा १७ वर्षांची झाले तेव्हा आमचे रिलेशनशिप सुरु झाले. यावेळी त्याने माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हटले होते. पण ते फारसे पटण्यासारखे नव्हते,” असेही सोमीने सांगितले.

नवीन वर्ष सुरु होताच शिल्पा शेट्टीने राज कुंद्रासोबत शेअर केली पहिली पोस्ट; पोहोचले शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला

सोमी अलीने वयाच्या १६व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने ९०च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले. सोमी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची गर्लफ्रेंड होती. पण १९९९मध्ये सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिने इंडस्ट्रीला रामराम ठोकला. ती परदेशात जाऊन राहू लागली. सोमी अलीने मिथून चक्रवर्तीसोबत ‘कृष्ण अवतार’, सैफ अली खानसोबत ‘यार गद्दार’ आणि सुनील शेट्टीसोबत ‘एंट’ यासारख्या बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan ex girlfriend somy ali reveals what had happened when she proposed marriage to him nrp