बॉलिवूडमध्ये सध्या #MeToo चं वादळ घोंघावत आहे. या वादळात बरीच मोठी नावं समोर आली. आता अभिनेता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिचा #MeToo अनुभव सांगितला. पाच वर्षांची असताना माझ्यासोबत लैंगिक गैरवर्तणूक झाल्याचं सोमीने सांगितलं.

‘पाच वर्षांची असताना घरातल्या एका नोकरानेच माझ्यासोबत लैंगिक गैरवर्तणूक केलं. अमेरिकेत मी जेव्हासुद्धा एखाद्या शाळेत जाते आणि तिथल्या मुलांशी चर्चा करते, तेव्हा माझ्यासोबत घडलेली ही घटना आवर्जून सांगते. कोणासोबत अशाप्रकारची घटना होत असेल तर त्यांनी समोर येऊन बोलावं, मोकळेपणाने सांगावं हाच त्यामागचा उद्देश आहे,’ असं ती म्हणाली.

वाचा : नाना पाटेकरांच्या समर्थनात कलाकार एकत्र

तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेला सुरुवात झाली. गेल्या पंधरा दिवसांत आलोक नाथ, साजिद खान, रजत कपूर, कैलाश खेर, अभिजीत भट्टाचार्य, पियूष मिश्रा, विनोद दुआ, श्याम कौशल, विकास बहल, सुभाष घई यांसारख्या कलाकारांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत.

Story img Loader