virat-450बॉलिवूडमध्ये ‘दबंग’ म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता सलमान खानचे अनेक चाहते आहेत. कित्येक तरुणींच्या गळ्यातील तो ताईत आहे. असे असले तरी आपल्यापेक्षा एक तरुण अधिक ‘चिकना’ असल्याचे बॉलिवूडच्या या सुपरस्टारचे म्हणणे आहे. कोण आहे तो ‘चिकना छोकरा’? तुम्हालासुद्धा प्रश्न पडला असेल ना… होय, तो आहे अनुष्का शर्माचा तथाकथित प्रियकर आणि धडाकेबाज भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली. विराट हा ‘चिकना छोकरा’ असल्याचे खुद्द सलमानचे म्हणणे आहे. असे बोलून सलमानने विराटची वाखाणणी केली आहे का टोमणे मारले आहेत ते गुलदस्त्यात आहे. आता, सलमानच्या या शेरेबाजीला विराट कशापद्धतीने प्रतिसाद देतो ते पाहाणे औत्सुक्याचे ठरेल. विराटपेक्षा आपण कमी हॅण्डसम दिसत असल्याचे सलमाने म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना सलमान म्हणाला, मी विराट कोहली सारखा असल्याचे मला वाटत नाही. मी विराट इतका ‘चिकना’ दिसत नाही. त्याचप्रमाणे लग्नाविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, माझे लग्न होता होता राहून गेले, असे अनेकवेळा झाले. देव जरा माझ्यावर जास्तच प्रसन्न अहे अस दिसतंय. माझ्या या बोलण्याचा अर्थ तुम्ही लग्न झालेल्यांना विचारू शकता.
salman-virat-450

 

 

 

 

 

salman-khan-virat-450

 

 

 

 

 

 

 

 

 

 

sallu-450

Story img Loader