बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वाढदिवसाच्या एक दिवसाआधी त्याला सर्पदंश झाल्याची घटना समोर आली. सलमानच्या पनवेलवरील फार्महाऊसवर ही घटना घडली. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तो पनवेलच्या फार्महाऊसवर गेला असताना हा अपघात झाला. यानंतर रात्री उशिरा सलमान खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आला. या संपूर्ण घटनेनंतर सलमान खान हा मीडियासमोर आला. त्यावेळी त्याने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली.

सलमान खान हा मीडियासमोर आला त्यावेळी त्याने काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले होते. त्यासोबत त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि तपकिरी रंगाची पँट घातली होती. यानंतर काही प्रसारमाध्यमांनी त्याला ही घटना नेमकी कशी घडली असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्याने घडलेली सर्व घटना सविस्तर पद्धतीने सांगितली.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…

“सलमानला दंश करणाऱ्या सापाला पकडलं अन्…, वडील सलीम खान यांनी दिले संपूर्ण घटनेवर स्पष्टीकरण

यावेळी सलमान म्हणाला, “माझ्या फार्महाऊसमध्ये साप घुसला होता. मी काठीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्याचवेळी तो साप माझ्या हाताजवळ आला. मी त्याला सोडण्यासाठी पकडले असता त्याने तीन वेळा मला दंश केला. त्यावेळी मला तो विषारी साप असल्याचे जाणवले. त्यानंतर मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास ६ तास मी रुग्णालयात होतो. पण आता मी ठीक आहे.”

दरम्यान आज (२७ डिसेंबर) अभिनेता सलमान खानचा वाढदिवस आहे. रात्री उशिरा त्याने पनवेल येथील त्यांच्या फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा केला. रविवारी सलमान खानला साप चावला होता, त्यानंतर यावेळेस तो वाढदिवस साजरा करणार नाही अशी प्रतिक्रिया समोर येत होत्या. मात्र त्याची प्रकृती सुधारत आहे. त्यानंतर रात्री सलमानने आपला वाढदिवस कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत साजरा केला. 

अभिनेता सलमान खानला सर्पदंश, पनवेलच्या फॉर्महाऊसवर घडली घटना

यानंतर सलमान खान माध्यमांसमोर आला होता. त्याच्या फार्महाऊसबाहेर अनेक फोटोग्राफर्सची गर्दी जमली होती. सलमानला गेटच्या बाहेर येताना पाहून एक फोटोग्राफर म्हणाला- ‘भाई, सुंदर स्माईल.’ सलमानाने त्याच्याकडे बघून हसत, ‘साप चावल्यानंतर असं हसणं खूप अवघड असतं,’ अशी प्रतिक्रिया दिली.

Story img Loader