सलमान खानच्या ‘बीइंग ह्य़ुमन’चे किस्से ऐकावे तेवढे कमीच आहेत. समोरच्याची कोणती गोष्ट त्याला आवडेल आणि तो त्याच्यासाठी काय-काय करेल, याचा नेम नाही. ‘जो आवडतो सलमानला.. तोचि आवडे बॉलिवूडला’, अशी या प्रेमगुरूबद्दलची भावना त्याच्या इथल्या भक्तांमध्ये आहे. बॉलिवूडमधील त्याच्या भक्तांच्या भाऊगर्दीतले एक नाव आहे ते टीव्हीवरचा खलनायकी हीरो करणवीर बोहरा. सध्या ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोमध्ये माधुरीचा लाडका स्पर्धक असलेला करणवीर सलमानचा खूप मोठा चाहता आहे. म्हणजे सलमानचे आणि आपले अगदी घरच्यांसारखे संबंध आहेत, असे सांगणाऱ्या करणवीरने आपल्या चित्रपटाची माहिती त्याच्या कानावर घातली. प्रेम नावानेच प्रसिद्ध झालेल्या प्रेमळ सलमानला करणवीरच्या प्रेमपटाची कथा ऐकून प्रेमाचे भरते आले. त्याच प्रेमाच्या भरात आपल्या पहिल्या यशस्वी प्रेमपटात वापरलेले बूट त्याने करणवीरला देऊन टाकले! सोनी वाहिनीवरच्या ‘जस्ट मोहोब्बत’ मालिकेतून छोटय़ा पडद्यावर आलेला करणवीर तेव्हापासून खलनायकी छटा असलेल्या नायकांच्या भूमिकेतच अडकून पडला. सध्या तो ‘लाईफ ओके’ वाहिनीवरील ‘सौभाग्यवती भव’ या मालिकेत काम करतो आहे. करणवीर एक प्रशिक्षित नर्तक असल्याने ‘झलक दिखला जा’मध्येही त्याने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्या सलमानभाईच्या मैत्रीचे दाखले देत तो फिरतो, त्याच्याशी गट्टी जमली तरी कशी? असे विचारल्यावर त्याने आपली खरी मैत्री होती ती सलमानच्या आईवडिलांशी. ‘तुम पापा के दोस्त हो तो मेरे खास दोस्त हुए..’ असे म्हणत सलमानने त्याच्याशी केलेली दोस्ती उत्तरोत्तर घट्ट होत गेली’, असे करणीवर सांगतो. दोस्तीच्या याच भावनेतून त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात सलमानने वापरलेले बूट त्याने करणवीरला देऊन टाकले. ‘मैने प्यार किया’मध्ये सलमानचे नाव प्रेम होते. हा चित्रपट यशस्वी ठरला आणि सलमान पुढच्या अनेक चित्रपटांमधून प्रेम म्हणूनच वावरला. आता प्रेमचे म्हणजे सलमानचे तेच बूट घालून करणवीर आपल्या चित्रपटातला ‘प्रेम’ रंगवेल. न जाणो, त्या बुटांच्या महतीने क रणवीरच्या चित्रपटावरही प्रेक्षक तितकेच प्रेम करतील..
सलमानच्या बुटात करणवीर!
सलमान खानच्या ‘बीइंग ह्य़ुमन’चे किस्से ऐकावे तेवढे कमीच आहेत. समोरच्याची कोणती गोष्ट त्याला आवडेल आणि तो त्याच्यासाठी काय-काय करेल, याचा नेम नाही. ‘जो आवडतो सलमानला.. तोचि आवडे बॉलिवूडला’, अशी या प्रेमगुरूबद्दलची
First published on: 26-06-2013 at 09:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan gave his shoes to karanveer